राघिणी... २ (एक बदल्याची भावना )
राघिणी... राघिणी आर्मीत येण्यापाठीमागे काय उद्देश आहे ? आर्मीत आल्यावर ती तिची ओळख का लपवून ठेवते ? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तिचे बाबा. रणजीत जेंव्हा तिला विचारतो की तू परदेशात शिकायला जाणार होतीस आणि अचानक अशी आर्मी जॉईन करते काय प्रकार आहे जरा सांग मला. तेंव्हा राघिणी रणजीतला घडलेला सगळा प्रकार सांगते. मधुकर राघिणी चे बाबा आर्मी ऑफिसर असतात. अतिशय प्रामाणिक आणि इमानदार ऑफिसर असतात. पण कॅम्प मध्ये काही वरिष्ठ अधिकारी परप्रांतीयांना चोरून गोळाबारुदाची सप्लाय करतात. मधुकरला ही गोष्ट कळते. तो घडणाऱ्या सगळ्या प्रकारचे ठोस पुरावे गोळा करतो. मधुकर रीतसर कारवाई करणार असतो तोच एका अधिकाऱ्याला भनक लागते की मधुकर त्यांच्या विरोधात षड्यंत्र उभा करतोय तोच सगळे अधिकारी मधुकरची बाजी मधुकरवर उलटवतात. त्याने गोळा केलेले पुरावे त्याच्याच विरोधात उभा करतात आणि त्याला देशद्रोही ठरवतात, मधुकरला बेइज्जत करून पदावरून हकलून देतात. त्या गोष्टीचा मधुकरला खूप मोठा धक्का बसतो, मधुकर त्याच झटक्यात paralyze होतो. ...