पोस्ट्स

kindness लेबलसह पोस्ट दाखवत आहे

राघिणी: Raghini

इमेज
  राघिणी:  Raghini        राघिनी दिसायला देखणी उंचपुरी सावळ्या रंगाची. लहानपण अगदीच लाडात गेलेलं आई बाबांची एकुलती एक मुलगी. तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेली. तिला इंजिनियर व्हायचं होतं आणि परदेशात नोकरीला जायचं होतं. बाबा मिलिटरी ऑफिसर. आई House wife. राघिनी कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला असतानाच तिच्या आणि तिच्या सुखी घराला ग्रहण लागलं आणि तिचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं.       राघिनीने कॉलेज सोडलं आणि आर्मी भरतीची जोरदार तयारी करू लागली.       कधी जेवणाचं तर सोडाच पण पाण्याचा तांब्या पण न उचलणारी राघिनी आज अचानक आर्मी भरतीसाठी एवढे कष्ट का घेतेय हे कोणालाच उमगत नव्हतं? अहोरात्र ती भरतीची तयारी करत होती. अथक परिश्रमातून शेवटी तिला यश मिळालं. ट्रेनिंगच्या कालावधीत तिने खूप मेहनत घेतली आणि तिचे बाबा ज्या पोष्ट वर होते त्याच पोष्ट वर ती रुजू झाली. आर्मी ऑफिसर मिस राघिनी.        राघीनीला कोणीतरी घेरलं आहे तिला कोणीतरी मारायचा प्रयत्न करतंय तिच्या आई ला कोणीतरी ढकलून देतंय, बाबांवर कोणीतरी लाठीन...

खेळ मांडला नियतीने

इमेज
खेळ मांडला नियतीने :   Destined to play the game:     देवाशिष स्वतःच्या दुनियेत (कल्पनाविश्वात) जगणारा मुलगा. दिसायला देखणा. सावळ्या रंगाचा.फूट उंचीचा पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकायला असतो. अतिशय श्रीमंतीत वाढलेला देवाशिष पण साधा भोळाच स्वभावाचा. एकलकोंड्या देवाशिष श्रीमंतीच्या प्रदर्शनापासून ४ हात लांब असतो. एक दिवस अनवधानाने ओळख झालेल्या मुलीच्या प्रेमात तो पडतो. नेमकी त्याच वेळेला त्याचं आयुष्य एक वेगळं वळण घेतं. देवाशिषचे आयुष्या हसरी बरोबर सुखात आनंदात चाललेलं असतं. पण सुखाला नजर न लागावी असं सुख काय कामाचं.    आयुष्याच्या वाटेवर प्रेमाच्या नात्याला एक नवीन नाव मिळणार तोच नियतीची नियत बदलते. आणि देवाशिषच्या प्रेमाला ग्रहण लागतं. अन् हसरीची साथ कायमची सुटते.           आनंदाच्या क्षणांनी भरलेलं देवाशिषचं आयुष्य पुन्हा एकलकोंडं बनून जातं. हसरीचं त्याच्या आयुष्यातून एकाकी गायब होणं त्याच्या आयुष्याला धक्का देवून जातं. हसरी त्याच्या आयुष्यात हवेच्या झुळकेप्रमाणे येवून निघून जाते. पण मनात असंख्य प्रश्नांचं काहूर सोडून ज...

विद्रोह....... २

इमेज
  विद्रोह....... Rebellion...   पुढे कित्येक दिवस, महिने कमली घराकडे फिरकलीच नाही. खूप लोकांकडे वाट्टेल त्या पद्धतीने तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण कमली काही सापडलीच नाही. रोज सकाळी कमलीच्या येण्याचा भास व्हायचा. कित्येक वेळा तर झोपेतच दचकून उठायचे. कमली रोज नवीनवीन गोष्टी सांगत राहायची भलेही त्या कोणी एकूण घेवू अगर नाही घेवू. एक दिवशी घरमालकीण आणि मी तिच्या सासरी गेलो जिथून तिला हाकलून दिलं होतं, तिला घरातून बाहेर काढण्याचं कारण म्हणजे कमलीला मुल बाळ होत नव्हतं. तिच्या सासरच्यांना घराण्याला वारस हवा होता. त्यामुळे कमलीला बेघर केलं होतं. कमली असतानाच कमलीच्या नवऱ्याने लग्न केलं होतं म्हणून कमलीच्या मनावर परिणाम झाला होता. आम्ही तिच्या सासरी चौकशी केली पण तिच्या घरच्यांनी काहीच माहिती दिली नाही उलट आम्हाला तिथून हुसकून दिलं. आम्ही दोघी तिथून निघालो पण जड मनाने. रस्त्यावरून जात असताना एक बाई आम्हाला हळूच इशारा करून घरात या म्हणाली आम्ही पण लगेच इकडे तिकडे बघून तिच्या घरात शिरलो. मनात शंका होतीच पण त्या बाईने जे सांगितले ते एकून मन सुन्न पडून गेलं. डोकं भदीर पडलं   ...

विद्रोह.......

इमेज
     विद्रोह.......   Rebellion .......        हो मला विद्रोह करायचाय....     दुःखाच्या आणि धोक्याच्या आगीत व्हरपळलेली ती मार्ग दिसेल तिकडे धाव घेत होती. पुरुषप्रधान संस्कुतीला कंटाळलेली ती बदल्याच्या भावनेनी पिसाळली होती. प्रेम, माया, जिव्हाळा या गोष्टीची तिला प्रचंड चीड येत होती. स्व:तपासूनच दूर जाऊ पाहत होती. सरलेल्या भूतकाळावर मात करण्यासाठी तिने भटकंती सुरु केली, फिरता फिरता ती एका छोट्याशा गावात येऊन पोहचली. एक छोटसं गाव आदिवासी होतं सगळा ती काही दिवस रमली तिथे पण नंतर तिला वास्तवाची खरी ओळख पटली. ‘कमली’ बरोबर तिची ओळख झाली. ‘कमली’अक्कल शून्य असल्यासारखी होती. फाटकी साडी, केसांच्या जटा झालेल्या, कपाळावर लाल भडक टिकली, लांबच लांब दात ओठांच्या बाहेर निघालेले, पिंगट डोळे, काळ्या रंगाची आणि मध्यम उंचीची कमली रोज घराघरात जाऊन शिळं मागून खायची. तिची आणि कमालीची हळू हळू मैत्री वाढत चालली होती, कमालीच्या नवऱ्याने कमलीला सोडली असं तिला तिच्या घरमालकीणी कडून समजलं. कमली अगोदर चांगली होती सुंदर रहायची आणि दिसायची सुद्धा पण ...

अव्यक्त.... कांती नारायण

इमेज
अव्यक्त ...            आपल्या सुप्त भावनांना मनातली मनात दाबून ठेवणारी कांता स्वतःचे मानसिक संतुलन हरवून बसली होती. तरीही तिच्यापुढे नारायण तिच्यापासून तोडून का वागत होता? याचं उत्तर काही मिळायला तयार नव्हतं.        नारायण स्वभावाने जरी गरीब असला अन कामाशी काम ठेवणारा असला तरी लग्नाअगोदर त्याच्या कडून काही चुका घडल्या होत्या. त्याच चुकांची फळ त्याच्याबरोबर कांतीदेखील भोगत होती. नारायण ट्रक ड्रायवर असल्यामुळे त्याला बऱ्याच वेळा रात्री घरी परत येणं जमत नसायचं. एके दिवशी थंडीच्या दिवसात नारायण ट्रक मध्ये माल घेवून जात असताना एका अनोळखी ठिकाणी ढाब्यावर थाबतो रात्र झाल्यामुळे तो तिथे मुक्काम करतो.  थंडीच्या दिवसात ढाब्यावर शेकोटीची सोय होती म्हणून तो बऱ्याच वेळ पर्यंत शेकोटी समोर बसून राहतो. त्याच वेळी तिथे अतिशय देखणी, गोरी गोमटी बाई येवून नारायणला अगदीच चिकटून बसते. नारायण लाजणं बाजूला सरकायला जातो तर ती त्याला धरून जागीच बसवते, अन ‘चला की मी थोडी गरमी देते ’ म्हणून त्याच्या अंगाला झोंबायला लागते. नारायण तिला धीटकारून बाजूला करतो आ...

अव्यक्त .......

इमेज
                           अव्यक्त ....... (Latent) समाजात खूप अशा गोष्टी आहेत ज्या अजूनही उघड पणे बोलल्या जात नाहीत. पण कुठून तरी त्या रुद्र रूप धारण करून बाहेर पडतात. समाजात प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी एक सोबती हवा असतो. आणि जर तोच नाही मिळाला तर विचारांचा आणि भावनांचा मनात कल्लोळ माजतो आणि विकृत कृत्य समाजात घडायला सुरुवात होते. बऱ्याच वेळा पुरुष आपल्या सुप्त भावनांना वाट मोकळी करून देतो पण महिलांमध्ये हे प्रमाण आजही खूप कमी आहे. बऱ्याच वेळा महिला स्वताला व्यक्त करू न शकल्यामुळे खचलेल्या, दबलेल्या मनस्थितीत असतात. आजही त्या पुरुषांपुढे व्यक्त व्हायला घाबरतात. शहरातली काहीशी परस्थिती सुधारली   असली तरी गाव गाड्यात अजून महिला चूल आणि मुल याच संकल्पनेत नांदतात. काही बायका आयुष्याच्या अस्तापर्यंत भुकेलेल्या देहाला दात ओठ खात लपवून ठेवतात तर काही बायका आपल्या सुप्त भावनांना मिळेल तिथे व्यक्त करतात. त्याच व्यक्त होण्याला समाज “लफड” म्हणतो. मग हे खरच लफडं आहे की तिला होणाऱ्या त्रासापासून मुक्त होण्याचा ...