लाखाचे बारा कसे वाजतात? २ How about twelve lakhs? : 2
लाखाचे बारा कसे वाजतात? : फार वर्षापूर्वी आणि काही भागात आजही पोलीस कसलिही शहानिशा न करता लोकांना गुन्हेगार ठरवते. माणसाच्या श्रीमंतीवरून त्याची लायकी ठरवली जाते. अंगावरच्या कपड्यावरून त्याची श्रीमंती ठरवली जाते. तशीच काहीशी गोष्ट गोकुळ बरोबर घडली. गोकुळ गरीब शेतकरी, दारुडा त्यामुळे अंगावरची कपडे अगदीच स्वच्छ असल्यामुळे त्याला आज जेल मध्ये पोलिसांनी सडायला भाग पडलं. चोरीचा ‘च’ ही माहीत नसलेला गोकुळ आज त्याच्या परिस्थितीमुळे आणि दारूमुळे तो जेल मध्ये बसला होता. एरवी पिवून झुलत हिंडणारा गोकुळ आज तुरुंगात निश्चिंत पडला होता. मात्र त्याच्या घरच्यांचे धाबे दणाणले होते. कधीच कोर्ट कचेरीची पायरी न ओलांडलेले गोकुळाच्या घरचे घाबरून गेले होते. आता काय करायचं गोकुळ ला कसं बाहेर काढायचं. बायका पोरं गावच्या सरपंचाकडे जावून त्यांना सोडवण्यासाठी मदत मागत होते. गावाच्या पुढाऱ्यांनी मदत केली पण पैशांची चांगलीच मागणी केली. आता पैसा फेकल्याशिवाय काहीच होणार नव्हतं हे गोकुळच्या घरच्यांना कळून चुकलं होतं. गोकुळने आणि त्यांच्या घरच्यांनी...