पोस्ट्स

Love लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Block... (त्याच्यातली ती):

इमेज
  Block... (त्याच्यातली ती): आज मला त्याने त्याच्यातल्या तिच्या विषयी सांगितले मग मी क्षणाचाही विलंब न करता त्याला रेखाटून काढले. सचेत कनिष्कचा जवळचा मित्र. शाळेच्या पहिल्या वर्गापासून एकत्र शिकलेले. कनिष्क अतिशय हुशार मुलगा. नेहमी वर्गात पहिला येणारा अतिशय देखणा. कनिष्क चॉकलेट बॉय असल्यामुळे वर्गात नेहमीच तो सगळ्यांचा लाडका असायचा. खूप वेळा त्याच्याकडे पाहून मुली मोहित व्हायच्या. पण त्याला भूलवेल किंवा त्याने कोणत्या मुलीच्या प्रेमात पडावं अशी मुलगी त्याला अजून सापडली नव्हती. त्याने जुनिअर कॉलेज पूर्ण केलं होतं. कनिष्क सिनियर कॉलेजच्या पहिल्या वर्गाला होता. त्याच्याबरोबर नेहमी शेपूट बनून राहणारा सचेतही होता. कॉलेज मध्ये कनिष्कचा खूप मोठा मुला मुलींचा ग्रुप झाला होता. सगळे खूप धमाल मस्ती करायचे. ठरल्याप्रमाणेच कनिष्क वर्गातही आणि ग्रुप मधेही हुशार आणि लाडका   होता.  सिनियर कॉलेज मध्ये सुकन्या ही एकटीच मुलगी होती जी कनिष्क ला अभ्यासात टक्कर द्यायची. ‘सुकन्या’ मोठ्या शहरात वाढलेली मुलगी पण तिच्या बाबांची गावाकडे बदली झाल्यामुळे ती गावाकडे आली होती. कनिष्कच्या घर...

खेळ मांडला नियतीने

इमेज
खेळ मांडला नियतीने :   Destined to play the game:     देवाशिष स्वतःच्या दुनियेत (कल्पनाविश्वात) जगणारा मुलगा. दिसायला देखणा. सावळ्या रंगाचा.फूट उंचीचा पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकायला असतो. अतिशय श्रीमंतीत वाढलेला देवाशिष पण साधा भोळाच स्वभावाचा. एकलकोंड्या देवाशिष श्रीमंतीच्या प्रदर्शनापासून ४ हात लांब असतो. एक दिवस अनवधानाने ओळख झालेल्या मुलीच्या प्रेमात तो पडतो. नेमकी त्याच वेळेला त्याचं आयुष्य एक वेगळं वळण घेतं. देवाशिषचे आयुष्या हसरी बरोबर सुखात आनंदात चाललेलं असतं. पण सुखाला नजर न लागावी असं सुख काय कामाचं.    आयुष्याच्या वाटेवर प्रेमाच्या नात्याला एक नवीन नाव मिळणार तोच नियतीची नियत बदलते. आणि देवाशिषच्या प्रेमाला ग्रहण लागतं. अन् हसरीची साथ कायमची सुटते.           आनंदाच्या क्षणांनी भरलेलं देवाशिषचं आयुष्य पुन्हा एकलकोंडं बनून जातं. हसरीचं त्याच्या आयुष्यातून एकाकी गायब होणं त्याच्या आयुष्याला धक्का देवून जातं. हसरी त्याच्या आयुष्यात हवेच्या झुळकेप्रमाणे येवून निघून जाते. पण मनात असंख्य प्रश्नांचं काहूर सोडून ज...

आज धंदा बंद! : part 2

इमेज
  आज धंदा बंद! 2      .....       डिंपल ने लांब लचक केसांचा बुचडा बांधून अर्धा मोकळा सोडला होता. कानात एक-एकच साखळी, पण खांद्यापर्यंत लोंबत होती. चेरीसारखा लालबुंद आणि मधाळ रस टपकावा असा ओठांवर साज तिने चढवला होता. तिला बघून कोणताही पुरुष मोहित व्हावा असाच तिचा तोरा होता... मी तिच्या सौंदर्याची पाहणी करत असतानाच ' तिने पुन्हा एकदा हात वर केले अन् कानठळ्या चीन्न करून टाकणारी टाळी वाजवली '. माझी नजर झप झप करत तिच्या चेहऱ्यावरून हाताकडे आणि पुन्हा हाताकडून चेहऱ्याकडे गेली. मी सुन्न होऊन तिच्याकडे पाहत होती अन् ती मात्र सगळ्या मुली, बायकांच्या डोक्यावर हात फिरवत “चलो दीदी निकालो पैसे जल्दी, दुवा मिल जायेगी,” म्हणत होती. कोणीतरी एक मुलगी तिच्या ओळखीची होती तिला ती खूपच लाडीक पणे म्हणाली ‘देखो राणी आज दस रुपये लूंगी तू हमेशा कम पैसे देती है|’ येवढं बोलून ती पुढे सरकली राणी ने तिला पाठीमागून आवाज दिला ‘ये डिंपल ये ले पैसे’ तेंव्हा मला तिचं नाव डिंपल आहे असं समजलं. सगळा वेळ ती इकडे तिकडे फिरत होती, फिरता फिरता उगाच मुलींना छेडायचं म्हणून ती नटखट हावभाव कर...

आज धंदा बंद! :

इमेज
  आज धंदा बंद! : part 1        हो आज ती निवांत बसली होती जोगेश्वरीच्या Platform वर, कसलीच धावपळ नाही, दगदग नाही, निश्चिंत, निरागस चेहरा घेऊन एकटीच बसली होती ती भुतासारखी. आज तिला काय झालं होतं काय माहित? तिला तसी बसलेली बघून मनात असंख्य प्रश्न येऊन गेले, की काय झालं असेल? कोण काय बोललं असेल का? कोणी तिला त्रास दिला असेल का? कोणी तिच्याबरोबर... छे काहीतरीच काय...    खरंतरं बऱ्याच दिवसाची इच्छा होती माझ्या मनात तिला रेखाटायची पण वेळेअभावी सतत त्या इच्छेला मी मारत आली पण आज काही रहावलच नाही... ‘डिंपल’ दिसायला प्रचंड देखणी, गोरी गोमटी, उंच पुरी तरी साधारण साडेपाच फुट असेलच. गोल गरगरीत डोळे त्यात गच्च भरलेलं काजळ, लांब सडक नाक आणि चार बोटांनी पण न व्यापणारं कपाळ अशी ती सडपातळ बांध्याची लाल साडीत एकदमच खुलून दिसायची. जशी पंजाबी ‘कुडी.’ मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं काही दिवसांपूर्वी, ते पण जोगेश्वरीच्याच Platform वरून ट्रेन मध्ये चढताना. संध्याकाळची वेळ साधारण ८.३० ते ९.०० च्या दरम्यान. योगा- योगाने ट्रेन मध्ये त्या दिवशी मला बसायला जागा मिळाली होती....

अव्यक्त.... कांती नारायण

इमेज
अव्यक्त ...            आपल्या सुप्त भावनांना मनातली मनात दाबून ठेवणारी कांता स्वतःचे मानसिक संतुलन हरवून बसली होती. तरीही तिच्यापुढे नारायण तिच्यापासून तोडून का वागत होता? याचं उत्तर काही मिळायला तयार नव्हतं.        नारायण स्वभावाने जरी गरीब असला अन कामाशी काम ठेवणारा असला तरी लग्नाअगोदर त्याच्या कडून काही चुका घडल्या होत्या. त्याच चुकांची फळ त्याच्याबरोबर कांतीदेखील भोगत होती. नारायण ट्रक ड्रायवर असल्यामुळे त्याला बऱ्याच वेळा रात्री घरी परत येणं जमत नसायचं. एके दिवशी थंडीच्या दिवसात नारायण ट्रक मध्ये माल घेवून जात असताना एका अनोळखी ठिकाणी ढाब्यावर थाबतो रात्र झाल्यामुळे तो तिथे मुक्काम करतो.  थंडीच्या दिवसात ढाब्यावर शेकोटीची सोय होती म्हणून तो बऱ्याच वेळ पर्यंत शेकोटी समोर बसून राहतो. त्याच वेळी तिथे अतिशय देखणी, गोरी गोमटी बाई येवून नारायणला अगदीच चिकटून बसते. नारायण लाजणं बाजूला सरकायला जातो तर ती त्याला धरून जागीच बसवते, अन ‘चला की मी थोडी गरमी देते ’ म्हणून त्याच्या अंगाला झोंबायला लागते. नारायण तिला धीटकारून बाजूला करतो आ...

अव्यक्त .......

इमेज
                           अव्यक्त ....... (Latent) समाजात खूप अशा गोष्टी आहेत ज्या अजूनही उघड पणे बोलल्या जात नाहीत. पण कुठून तरी त्या रुद्र रूप धारण करून बाहेर पडतात. समाजात प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी एक सोबती हवा असतो. आणि जर तोच नाही मिळाला तर विचारांचा आणि भावनांचा मनात कल्लोळ माजतो आणि विकृत कृत्य समाजात घडायला सुरुवात होते. बऱ्याच वेळा पुरुष आपल्या सुप्त भावनांना वाट मोकळी करून देतो पण महिलांमध्ये हे प्रमाण आजही खूप कमी आहे. बऱ्याच वेळा महिला स्वताला व्यक्त करू न शकल्यामुळे खचलेल्या, दबलेल्या मनस्थितीत असतात. आजही त्या पुरुषांपुढे व्यक्त व्हायला घाबरतात. शहरातली काहीशी परस्थिती सुधारली   असली तरी गाव गाड्यात अजून महिला चूल आणि मुल याच संकल्पनेत नांदतात. काही बायका आयुष्याच्या अस्तापर्यंत भुकेलेल्या देहाला दात ओठ खात लपवून ठेवतात तर काही बायका आपल्या सुप्त भावनांना मिळेल तिथे व्यक्त करतात. त्याच व्यक्त होण्याला समाज “लफड” म्हणतो. मग हे खरच लफडं आहे की तिला होणाऱ्या त्रासापासून मुक्त होण्याचा ...