पोस्ट्स

How about twelve lakhs? लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लाखाचे बारा कसे वाजतात? : How about twelve lakhs? :

इमेज
  लाखाचे बारा कसे वाजतात? :    गोष्ट तशी जुनीच पण मी आज तुमच्या पुढे नव्याने मांडते आहे. लाखाचे बारा कसे वाजतात हे फक्त गावाकडच्या दारुड्या लोकांना आणि त्याच्या घरच्यांनाच माहित असतं. अशीच विनाकारण अंगलोट आलेली एक गोष्ट तुमच्या समोर मांडते.        हौसेला मोल नाही म्हणतात ते खरच, दारू पिणाऱ्या लोकांच पण तेच तर असतं दारू पिवून झाकी मारत फिरायचं हीच हौस असते. पण काही लोकांच्या ही हौस अंगलोट येते. जस की गोकुळ १० रुपयांचा फुगा प्यायचा पण बाता मात्र जगभराच्या करायचा. (फुगा – गावाकडे मिळणाऱ्या हातभट्टी चा एक ग्लास)      गोकुळ दारू प्यायल्यानंतर अख्खा गाव डोक्यावर घ्यायचा, त्याच्या घरचे त्याला खूप कंटाळले होते, दारू पिवून कुठेपण रस्त्याच्या कडेला त्याची टांगापलटी व्हायची, मग त्याची दोन मुलं एकाचं लग्न झालेलं एकाचं नाही ती त्याला घरी घेवून यायची. खूप वेळा असं व्हायचं की गोकुळ पिवून आला की घरच्यांना घराबाहेर काढायचा त्याचा दबदबा किती आहे हे दाखवण्यासाठी तो सगळ्यांना घराबाहेर झोपवायचा. घराबाहेर म्हणजेच शेतात, घर शेतात होतं म्हणून ...