विद्रोह....... २

 

विद्रोह....... Rebellion...

 

पुढे कित्येक दिवस, महिने कमली घराकडे फिरकलीच नाही. खूप लोकांकडे वाट्टेल त्या पद्धतीने तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण कमली काही सापडलीच नाही. रोज सकाळी कमलीच्या येण्याचा भास व्हायचा. कित्येक वेळा तर झोपेतच दचकून उठायचे. कमली रोज नवीनवीन गोष्टी सांगत राहायची भलेही त्या कोणी एकूण घेवू अगर नाही घेवू.

एक दिवशी घरमालकीण आणि मी तिच्या सासरी गेलो जिथून तिला हाकलून दिलं होतं, तिला घरातून बाहेर काढण्याचं कारण म्हणजे कमलीला मुल बाळ होत नव्हतं. तिच्या सासरच्यांना घराण्याला वारस हवा होता. त्यामुळे कमलीला बेघर केलं होतं. कमली असतानाच कमलीच्या नवऱ्याने लग्न केलं होतं म्हणून कमलीच्या मनावर परिणाम झाला होता.

आम्ही तिच्या सासरी चौकशी केली पण तिच्या घरच्यांनी काहीच माहिती दिली नाही उलट आम्हाला तिथून हुसकून दिलं. आम्ही दोघी तिथून निघालो पण जड मनाने. रस्त्यावरून जात असताना एक बाई आम्हाला हळूच इशारा करून घरात या म्हणाली आम्ही पण लगेच इकडे तिकडे बघून तिच्या घरात शिरलो. मनात शंका होतीच पण त्या बाईने जे सांगितले ते एकून मन सुन्न पडून गेलं. डोकं भदीर पडलं  काय बोलावं? उमजायलाच मार्ग नव्हता. कमलीचं अस्तित्व या जगातून हरवलं म्हणल्यावर आणखी काय होणार होतं. कमलीच्या नावावर तिच्या नवऱ्याने जमीन केली होती कारण कमलीने दुसरं लग्न करायला अडवू नये म्हणून. ती जमीन परत नावावर करण्यासाठी तिच्या नवऱ्याने तिचा घात केला होता. कमलीचे आई वडील कोणीच नव्हतं म्हणून तिची बाजू उचलून धरण्यासाठी कोणी पुढे सरसावलेच नाहीत. आणि याच संधीचा फायदा तिच्या नवऱ्याने उचलला. अन तिच्या जीवावर बेतवून जमीन बळकवली. 

झालेला प्रकार एकून मन मनातून रडत होतं आणि वारंवार या पुरुषप्रधान संस्कृतीचा विद्रोह करण्यासाठी झेपावत होतं पण माझ्याकडे काहीच पर्याय आणि ठोस पुरावा नव्हता. म्हणून शेवटी मनाने केलेला विद्रोह मनातच राहून गेला.

-Lolly

English Translation : 

     For the next several days, months, Kamali did not return home. Many people tried to find her but Kamali could not find anything. Kamali used to come every morning. Many times I would wake up in my sleep. Whether Kamali keeps telling new things every day, whether one takes it or not.

 

               One day the housewife and I went to her mother-in-law's house from where she had been evicted. Her father-in-law wanted an heir to the family. So Kamali was made homeless. Kamali's mind was affected as Kamali's husband got married while she was still Kamali.

 

               We interrogated her mother-in-law but her family did not provide any information and instead drove us away. We both left but with a heavy heart. As we were walking down the street, a lady beckoned us to enter the house, but we immediately looked around and entered her house. There were doubts in my mind but I was completely stunned by what the woman said. What should I say if my head hurts? There was no way to understand. What else would happen if Kamali's existence was lost in this world? Her husband had made the land in Kamali's name so that Kamali would not be prevented from remarrying. She was beaten by her husband to get the land back in her name. Kamali's parents were not there, so no one came forward to support her. And her husband took advantage of this opportunity. Ann grabbed her life and grabbed the land.
 
               The whole thing was crying out in my heart and trying to revolt against this patriarchal culture but I had no choice and no concrete evidence. So in the end the rebellion of the mind remained in the mind.
 
 
                                                                                                                          -Lolly

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी हक्क: Tribal Rights : 1

जन्मठेप : १ Birth control: 1

आदिवासी हक्क : २ Tribal Rights 2