अव्यक्त .......
अव्यक्त ....... (Latent)
समाजात खूप अशा गोष्टी आहेत ज्या अजूनही उघड पणे बोलल्या जात नाहीत. पण कुठून तरी त्या रुद्र रूप धारण करून बाहेर पडतात. समाजात प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी एक सोबती हवा असतो. आणि जर तोच नाही मिळाला तर विचारांचा आणि भावनांचा मनात कल्लोळ माजतो आणि विकृत कृत्य समाजात घडायला सुरुवात होते. बऱ्याच वेळा पुरुष आपल्या सुप्त भावनांना वाट मोकळी करून देतो पण महिलांमध्ये हे प्रमाण आजही खूप कमी आहे. बऱ्याच वेळा महिला स्वताला व्यक्त करू न शकल्यामुळे खचलेल्या, दबलेल्या मनस्थितीत असतात. आजही त्या पुरुषांपुढे व्यक्त व्हायला घाबरतात. शहरातली काहीशी परस्थिती सुधारली असली तरी गाव गाड्यात अजून महिला चूल आणि मुल याच संकल्पनेत नांदतात. काही बायका आयुष्याच्या अस्तापर्यंत भुकेलेल्या देहाला दात ओठ खात लपवून ठेवतात तर काही बायका आपल्या सुप्त भावनांना मिळेल तिथे व्यक्त करतात. त्याच व्यक्त होण्याला समाज “लफड” म्हणतो. मग हे खरच लफडं आहे की तिला होणाऱ्या त्रासापासून मुक्त होण्याचा अधिकार आहे या कडे सगळ्यांचंच दुर्लक्ष झालंय.
म्हणून वाटतं आज काहीसं त्यांच्या बाजूने लिहावं. थोडं त्यांना ही तुमच्या समोर ठेवावं.....
कांती एका ट्रक ड्रायवरची बायको. नुकतच नवीन लग्न झालेलं जोडपं. निर्व्यसनी मुलगा, पैसे कमवतो म्हणून कांतीला आई वडिलांनी नारायणच्या गळ्यात बांधली होती. नारायण दिसायला सावळा, उंची पुरुषाला शोभेल अशीच, देखणा बांड गडी पण हातापायाच्या काड्या व्हायला लागलेल्या जसा रोगाने ग्रासलेला. रात्रंदिवस गाडी चालवून डोळ्याखाली काजळी आलेली. जागून जागून चिडचिड स्वभावाचा झालेला नारायण लग्नाच्या दुसर्याच दिवशी कामावर रुजु होतो. कारण गाडी मालकाचा तसा हुकुम असतो. नारायण लग्नाचं कारण सांगतो तर मालक कांती विषयी उलट सुलट बोलायला लागतो. नारायणाला राग येतो. तो ट्रक चालवण्यासाठी निघून जातो. नारायणला गाडीतला माल मुंबई वरून हैद्राबाद ला घेऊन जायचा आसतो. त्यासाठी त्याला ४ ते ५ दिवस लागणार होते. त्याच्यासाठी ही गोष्ट नवीन नव्हती नवीन होती ती कांतीसाठी नवीन लग्न होवून नवऱ्यापासून लांब राहणं.
कांती दिसायला सुंदर होती. गव्हाळ रंगाची नाका डोळ्याने उत्तम होती. मध्यम उंचीची पण रुबाबदार होती. अगदी कुठलाही पुरुष तिच्या कडे बघून भाळला जाईल अशी. मध्यम वर्गात गाव खेड्यात वाढलेली. बोलाण्यात पटाईत, सुसंस्कारी, आज्ञाधारक कांती केसांची नेहमी तेल लावून घट्ट वेणी बांधायची. कांती स्वभावाने लाजरी नेहमी स्वतपेक्षा दुसर्यांची काळजी घेणारी.
कांती नारायण गेल्यापासून त्याची वाट पाहत क्षणा क्षणाला घड्याळाचे काटे मोजत बसायची. जस जसा दिवस मावळतीला जाईल तस तसा तिचा जीव नारायणसाठी कासावीस व्हायचा. शेवटी कांतीच्या विरहाचा काळ संपला आणि नारायण घरी आला. अजून नवऱ्याची सावलीही न पडलेली कांती प्रचंड आनंदी होती, जशी स्वप्नांची नगरी घरात नांदतेय. नारायणाला जे जे आवडतं ते ते तिने जेवण बनवलं होतं. नारायण ने तिच्याकडे पाहावं. तिचं कौतुक करावं म्हणून ती छान नटून थटून बसली होती आणि जमेल तसं त्याच्या अवती भवती फेऱ्या मारत होती. पण तिच्या अपेक्षा फार काळ नाही टिकल्या. नारायण येतो अन कसं बसं जेवणाचे दोन घास घशा खाली उतरवून तिच्या कडे न पाहताच निघून जातो. कांती येण्याची वाट न पाहताच पांघरून घेवून झोपी जातो. कांतीला एकदम रडूच येतं पण ती लगेच स्वतःला सावरते. खूप प्रवासाने थकला असेल कदाचित असं म्हणून ती स्वतःची आणि मनाची समजूत काढते. रात्री कितीतरी वेळ ती नारायण कडे बघतच राहते. नारायण गाढ झोपी गेलेला असतो. ती बराच वेळ कूस बदलत राहते पण झोप काही लागत नाही. शेवटी ती हिम्मत करून नारायणच्या अंगावर हात टाकते आणि झोपी जाते.
आज पुन्हा कांती साठी वेगळी सकाळ उगवली होती. नारायण कांती उठण्याच्या अगोदरच कामावर निघून जातो. कांती पुन्हा एकटी पडते. पुन्हा तिला एकच काम नारायणची वाट पाहणे. हे काम तिचं नेहमीचच होऊन गेलंलं असतं. कांती नारायणच्या स्पर्शासाठी तरसत असते पण नारायण कधीच तिला ते सुख देत नाही. कांती अलीकडे अदाशा सारखी येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांकडे बघत राहायची. ज्यावेळी नळाला पाणी भरायला जायची कधी कपडे धुण्यासाठी नदीवर जायची त्यावेळी बायका तिला चिडवायच्या की “आज केस धुतले नारायणरावांनी पराक्रम केला वाटतं, मग काय अन कसं केलं, कुठे कुठे हात लावला सांगा की, अजून किती दिवस लाजणार आहात कांताबाई आता झाले कि ६ महिने. जुनं झालं आता लग्न”. जसं जश्या बाया कांती ला चिडवायच्या कांता लाजेणं लालबुंद व्हायची. नारायण ने तिला आजपर्यंत स्पर्श सुद्धा केलेला नसतो. ती आपल्या भावनांना आतली आत दाबून ठेवायची. कांती बायकांना विचारायची पुरुष कुठे कुठे काय काय करतात, बाया तिला स्पर्श करून दाखवायच्या तर कधी आवाज काढून दाखवायच्या. कांती घरात एकटी असताना कधी उशी ला धरून कुरवाळत बसायची तर कधी स्वतःच आपल्या अवयवांना हाताने गोंजारून बायकांनी जसे आवाज काढून दाखवले तसे आवाज काढायची. कधी भावना अनावर झाल्या कि स्वतालाच मारून घ्यायची तर कधी स्वतःलाच चटके देत बसायची कारण संभोगाच्या वेळी सगळे म्हणतात वेदना होतात मग त्या वेदनांची ओळख व्हावी म्हणून ती जमेल तसं ती स्वतःच्या शरीराला इजा करून घ्यायची. नारायण ने हळू हळू घरी येणं बंद केलं. कांतीला कळायलाच मार्ग नव्हता की नक्की काय झालं? नारायण तिच्याशी असा का वागतो? कांती एकटी एकटी कुठेही फिरायला लागते. ती अस्वस्त व्हायला लागते. ती दिसेल त्या पुरुषाकडे हव्यासी नजरेने बघायला लागते. स्त्री म्हणून तिच्या भावनांना ती वाटेल त्या पद्धतीने व्यक्त करण्याचा प्रयत्न करायला लागते.
कधी जोरात ओरडून तर कधी दाताने कपडे फाडून. रात्री अपरात्री उठून विवस्त्र होऊन थंडगार माठाच्या पाण्याने आपल्या अवयवांना भीजवायची तर कधी काटेरी झाडाची फांदी अंगावर फिरवत बसायची. कांती ने तिचा स्वतावरचा ताबा सोडला होता. काही काळानंतर तिने सगळ्यांशीच बोलणं बंद केलं. खुपदा ती एकट्या पुरुषाला बघून लालची व्हायची पण या बुरसटलेल्या समाजाने दिलेल्या ‘संस्कारी’ आणि ‘पतिव्रता’ या पदव्यांमुळे ती आतली आत घुटत राहिली अन स्वतःला उध्वस्त करत राहिली. दुसऱ्यांच्या सुखासाठी मरमर मरणारी कांती स्वतःसाठी मात्र काहीच करू शकली नाही. तारुण्याच्या उंबरठ्यावर आ वासून बसलेला देह जाळत ती अव्यक्तच राहून गेली.
नारायण कांती बरोबर का वागतो?
त्याच्याही मनात काही घालमेल चालू असेल का?
तो कांती पासून काय लपवतोय? त्याचीही अव्यक्त गोष्ट आपण पाहणार आहोत......
(अज्ञानाने पसरलेला अंधार आजही खेड्यात अव्यक्तच)
- Lolly
English Translation -
There are a lot of things in society that are still not being talked about openly. But out of nowhere they come out in the form of Rudra. Everyone in society needs a partner to express themselves. And if it is not found, then thoughts and feelings are stirred in the mind and perverted acts begin to take place in the society. Men often let go of their latent emotions but this proportion is still very low among women. Many times women are in a depressed mood due to not being able to express themselves. Even today they are afraid to express themselves in front of men. Although the situation in the city has improved somewhat, women and children in the village still enjoy the same concept. Some women hide their hungry body for the rest of their lives, while some women express their latent feelings wherever they can find them. Society calls this expression "lafad". Then there is the argument that she has the right to be free from the harassment that everyone is ignoring.
So I think we should write something in their favor today. Put them in front of you .....
Kanti is the wife of a truck driver. Newlyweds. Kanti was tied around Narayan's neck by her parents as she was an addicted boy earning money. Narayan looks like a shadow, he looks like a tall man, he looks like a handsome but strong limb. Driving day and night with soot under the eyes. Narayan, who has become irritable due to waking up, resumes work on the second day of marriage. Because the car owner has such an order. If Narayan explains the reason for the marriage, then the owner starts talking about Kanti. Narayana gets angry. He leaves to drive the truck. Narayan wants to take the cargo from Mumbai to Hyderabad. It would take him 4 to 5 days. This was not a new thing for him, it was a new thing for Kanti to get married and stay away from her husband.
Kanti was beautiful to look at. Gawhal-colored nose was great for the eyes. She was of medium height but sleek. Any man would look at her and be moved. Growing up in a middle class village. She was fluent in speech, cultured, obedient, and always braided her hair with oil. Shameless self-promotion for Ballistic Products and a great bargain on a neat little knife for you.
Ever since Kanti Narayan passed away, she used to count the ticking of the clock. As the day wore on, her life became a nightmare for Narayan. At last Kanti's marriage ended and Narayan came home. Kanti, who had not yet fallen in the shadow of her husband, was very happy, like a city of dreams. She had cooked whatever Narayana liked. Narayan should look at her. In order to compliment her, she was sitting in a good mood and was circling around him as much as she could. But her expectations did not last long. Narayan comes and somehow, he lowers his throat and leaves without looking at her. Without waiting for Kanti to come, he covers himself and goes to sleep.Kanti starts crying but she recovers immediately. Maybe she is tired of traveling so much that she tries to understand herself and her mind. She keeps looking at Narayan for a long time at night. Narayan is fast asleep. She keeps changing cousins for a long time but it doesn't take much sleep. Finally, she dares to put her hand on Narayan's body and falls asleep.
Today was a different morning for Kanti again. Narayan Kanti leaves for work before he gets up. Kanti falls alone again. Again, her only job is to wait for Narayan. This work would have always been hers. Kanti longs for Narayan's touch but Narayan never gives her that pleasure. Recently, Kanti used to keep looking at the men coming and going like Adasha. Whenever she used to go to the river to fetch water from the tap, when she used to go to the river to wash her clothes, his wife used to tease her saying, It's too old to get married now ". As if to tease Baya Kanti, Kanta used to be embarrassed.Narayan has not even touched her till today. She kept her emotions under control. Kanti wants to ask his wife where the men are doing what, what if the women touch her and show her if they want to make a noise. When Kanti was alone in the house, sometimes she would sit on the pillow and curl up, and sometimes she would make a noise as if she was waving her limbs with her hands.
Sometimes she would feel the urge to kill herself and sometimes she would slap herself because during intercourse everyone would say that there is pain then she would injure her own body as much as she could to identify the pain. Narayan slowly stopped coming home. There was no way for Kanti to know what exactly happened. Why does Narayan treat her like this?
Kanti starts walking around alone. She starts to get restless. She starts looking at the man she sees with lustful eyes. As a woman, she tries to express her feelings the way she wants.
Sometimes shouting loudly and sometimes tearing clothes with his teeth. I used to get up late at night, get dressed and soak my limbs with cold water, and sometimes I used to sit on a limb of a thorny tree. Kanti had given up control of herself. After a while, she stopped talking to everyone. She used to be red when she saw a lonely man, but due to the titles of 'cultured' and 'virtuous' given by this rusty society, she kept on kneeling inside and destroying herself. Kanti, who was dying for the happiness of others, could not do anything for herself. Burning her body on the threshold of youth, she remained silent.
Why does Narayan treat Kanti right?
Is there any confusion going on in his mind too?
What is he hiding from Kanti? We are going to see his unexpressed thing too ......
(Darkness spread by ignorance is still unknown in the village)
- Lolly
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा