जुगार : Gambling : 2
जुगार : Gambling (पैशाचा की बायका पोरांच्या आयुष्याचा?) ज्या भावाने पैसे कमवायचा रस्ता दाखवला त्याच भावाने घालवायचा पण दाखवला. .. म्हणजे सट्टेबाजी बरोबर रंडीबाजी पण झालीच पाहिजे. एक दिवस सतीशला त्याचा भाव दारू पाजून एका अशा ठिकाणी घेवून जातो जिथून माघारी येणं म्हणजेच भिकेचे डोहाळे शंभर टक्के लागणा हे निश्चित. सतीश कडे पैसा होता त्यामुळे त्याला दारू आणि बाहेरच्या बाईची लथ लागून गेली. पण पैश्यांचा माज खूप दिवस राहत नाही. काही दिवस वर्ष सतीश सुखा समाधानात खेळला पण दारू आणि बाईने त्याला उतरती कळा लावायची ती लावलीच. हळू हळू त्याच्या जवळची जमापुंजी संपत आली होती. आता त्याला जुगारित यश येणं काही जमायला लागलं नाही. त्यांनी काढलेल्या युक्त्या त्याच्याच पल्ले पडत नव्हत्या. २४ तास नशेत पडून राहायचा म्हणून त्याचा सट्टेबाजी वरचा ताबा सुटून गेला आणि तो पुन्हा जन्माचा भिकारी झाला. ठेवलेली बाई पण पैसे नसल्यामुळे त्याला हाकलून द्यायला लागली. घरात होतं नव्हतं ते विकून टाकलं होतं. आता फक्त घराच्या भिंती तेवढ्या उभ्या होत्या. पण घर उभा करणारा पाया मात्र खचला ...