जन्मठेप : २ Birth control: 2
जन्मठेप : २ Birth control रोजच्या सारखीच आजही सुकन्या नटून थटून शेळ्या घेवून शेतात चारायला आली होती, आजही छान हसून आणि नाचून दिवस गोड करून पुढे शेळ्या चारायला निघून गेली. पण आज जे तिच्या समोर वाडून ठेवलं होतं ते ना तिला माहित होतं ना आम्ही कधी कल्पना केली होती...... शेतात चरता चरता शेळ्यानी आज अचानक जंगलाकडे धाव घेतली. सैराट झालेल्या शेळ्यांना आवरता आवरता थकून गेलेली सुकन्या एका झाडाखाली बसली होती. शेळ्यांच्या पाठीमागे पळून पळून तहान लागल्यामुळे ती पाण्याने भरलेली बॉटल शोधू लागली पण पळता पळता बॉटल कुठेतरी पडली तिला समजलंच नाही. तहानेने घसा सुकून गेला होता तिला आता पाण्याशिवाय राहवेना म्हणून तिने पुन्हा शेळ्या घराच्या दिशेने हकलून काढल्या. जंगलातून घरी येताना तिला एक छोटंसं घर दिसलं, तहानेने व्याकूळ झालेल्या सुकन्येला वाटलं थोडंसं पाणी मागून पहावं, घरी पोहोचेपर्यंत तहान तरी भागेल, या आशेने ती त्या छोट्याश्या घरासमोर गेली दरवाजा उघडाच होता पण बाहेर कोणी दिसत नव्हतं म्हणून ती घरात डोकावण्यासाठी पुढे सरसावली तोच एक ५०,५५ वर्षाचा माणूस तिच्या समोर येवून थांबला. साधी ...