पोस्ट्स

Latent लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अव्यक्त.... कांती नारायण

इमेज
अव्यक्त ...            आपल्या सुप्त भावनांना मनातली मनात दाबून ठेवणारी कांता स्वतःचे मानसिक संतुलन हरवून बसली होती. तरीही तिच्यापुढे नारायण तिच्यापासून तोडून का वागत होता? याचं उत्तर काही मिळायला तयार नव्हतं.        नारायण स्वभावाने जरी गरीब असला अन कामाशी काम ठेवणारा असला तरी लग्नाअगोदर त्याच्या कडून काही चुका घडल्या होत्या. त्याच चुकांची फळ त्याच्याबरोबर कांतीदेखील भोगत होती. नारायण ट्रक ड्रायवर असल्यामुळे त्याला बऱ्याच वेळा रात्री घरी परत येणं जमत नसायचं. एके दिवशी थंडीच्या दिवसात नारायण ट्रक मध्ये माल घेवून जात असताना एका अनोळखी ठिकाणी ढाब्यावर थाबतो रात्र झाल्यामुळे तो तिथे मुक्काम करतो.  थंडीच्या दिवसात ढाब्यावर शेकोटीची सोय होती म्हणून तो बऱ्याच वेळ पर्यंत शेकोटी समोर बसून राहतो. त्याच वेळी तिथे अतिशय देखणी, गोरी गोमटी बाई येवून नारायणला अगदीच चिकटून बसते. नारायण लाजणं बाजूला सरकायला जातो तर ती त्याला धरून जागीच बसवते, अन ‘चला की मी थोडी गरमी देते ’ म्हणून त्याच्या अंगाला झोंबायला लागते. नारायण तिला धीटकारून बाजूला करतो आ...

अव्यक्त .......

इमेज
                           अव्यक्त ....... (Latent) समाजात खूप अशा गोष्टी आहेत ज्या अजूनही उघड पणे बोलल्या जात नाहीत. पण कुठून तरी त्या रुद्र रूप धारण करून बाहेर पडतात. समाजात प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी एक सोबती हवा असतो. आणि जर तोच नाही मिळाला तर विचारांचा आणि भावनांचा मनात कल्लोळ माजतो आणि विकृत कृत्य समाजात घडायला सुरुवात होते. बऱ्याच वेळा पुरुष आपल्या सुप्त भावनांना वाट मोकळी करून देतो पण महिलांमध्ये हे प्रमाण आजही खूप कमी आहे. बऱ्याच वेळा महिला स्वताला व्यक्त करू न शकल्यामुळे खचलेल्या, दबलेल्या मनस्थितीत असतात. आजही त्या पुरुषांपुढे व्यक्त व्हायला घाबरतात. शहरातली काहीशी परस्थिती सुधारली   असली तरी गाव गाड्यात अजून महिला चूल आणि मुल याच संकल्पनेत नांदतात. काही बायका आयुष्याच्या अस्तापर्यंत भुकेलेल्या देहाला दात ओठ खात लपवून ठेवतात तर काही बायका आपल्या सुप्त भावनांना मिळेल तिथे व्यक्त करतात. त्याच व्यक्त होण्याला समाज “लफड” म्हणतो. मग हे खरच लफडं आहे की तिला होणाऱ्या त्रासापासून मुक्त होण्याचा ...