आज धंदा बंद! : part 2
आज धंदा बंद! 2
.....
डिंपल ने लांब लचक केसांचा बुचडा बांधून अर्धा मोकळा सोडला होता. कानात एक-एकच साखळी, पण खांद्यापर्यंत लोंबत होती. चेरीसारखा लालबुंद आणि मधाळ रस टपकावा असा ओठांवर साज तिने चढवला होता. तिला बघून कोणताही पुरुष मोहित व्हावा असाच तिचा तोरा होता...
मी तिच्या सौंदर्याची पाहणी करत असतानाच 'तिने पुन्हा एकदा हात वर केले अन् कानठळ्या चीन्न करून टाकणारी टाळी वाजवली'. माझी नजर झप झप करत तिच्या चेहऱ्यावरून हाताकडे आणि पुन्हा हाताकडून चेहऱ्याकडे गेली. मी सुन्न होऊन तिच्याकडे पाहत होती अन् ती मात्र सगळ्या मुली, बायकांच्या डोक्यावर हात फिरवत “चलो दीदी निकालो पैसे जल्दी, दुवा मिल जायेगी,” म्हणत होती. कोणीतरी एक मुलगी तिच्या ओळखीची होती तिला ती खूपच लाडीक पणे म्हणाली ‘देखो राणी आज दस रुपये लूंगी तू हमेशा कम पैसे देती है|’ येवढं बोलून ती पुढे सरकली राणी ने तिला पाठीमागून आवाज दिला ‘ये डिंपल ये ले पैसे’ तेंव्हा मला तिचं नाव डिंपल आहे असं समजलं. सगळा वेळ ती इकडे तिकडे फिरत होती, फिरता फिरता उगाच मुलींना छेडायचं म्हणून ती नटखट हावभाव करत तोंड ओळख असलेल्या मुलींना ‘कैसी है रे तू, सब ठीक है ना’! म्हणत पुढे सरकत होती. मी मात्र तिच्याकडेच एकटक बघत होती. मी तिच्याकडेच बघत असतानाच ती माझ्या एकदम जवळ आली अन् म्हणाली, ‘मेको पैसा भी देगी या खाली देखती रहेगी, अच्छा मैं ठीक लग रही हूँ ना?’ तिच्या त्या बोलण्यामुळे आणि प्रश्नामुळे मला थोडं हसू आलं. गालातली गालात हसत मी पैसे काढले तिने उत्तराची अपेक्षा न करताच ‘चलो स्टेशन आ गया’, म्हणत नखरेल अदा करून’ पैसे घेऊन निघून गेली. त्यानंतर ती मला फक्त एकदाच दिसली...
पुढचे कित्येक दिवस ती गायब झाली होती. माहित नाही कुठे गेली होती. मला ट्रेनच्या प्रवासादरम्यान बऱ्याच वेळा तिची आठवण झाली होती. पण आता ती दिसत नाही म्हंटल्यावर, गेली असेल दुसरीकडे कुठेतरी असं वाटलं होतं. एव्हाना मला तिचा विसरही पडला होता.....
पण, आज ती पुन्हा दिसली जोगेश्वरीच्याच Platform वर. तिला अशी अचानक बघून माझी नजर आनंदाने चमकली. पण ती आज नाराज होती, मावळलेल्या उत्साहात निर्विकार, निखळ देह घेऊन, निवांत मांडी घालून बसली होती. जणू खूप थकल्यासारखी, खूप दमल्यासारखी आणि आता तिला एक निवांत क्षण हवाय. तेवढ्यात ट्रेनमधून उतरलेल्या तिच्या ओळखीच्या एका मुलीने तिला पाहिलं अन् हात वर करून विचारलं ‘काय, आज निवांतंय’? तिने पण चेहऱ्यावर उसनं हसू आणलं अन् बोलण्यासाठी जणू शब्द जड झाल्यासारखचं ईशाऱ्यातच उत्तर दिलं, “हो, आज धंदा बंद!”
- Lolly
Dimple had tied up a bundle of long hair and left it half free. A single chain in the ear, but hanging up to the shoulder. Cherikayand and Madhal were dripping red. The Torah was such that any man should be fascinated by seeing her ......
While I was observing her beauty, she raised her hand once more and clapped her hands. My gaze shifted from her face to her hand and from hand to face again. I was staring at her in a daze, but at the end all the girls were turning their hands on the heads of the women and saying, "Let's get rid of Didi, the money will come soon, the link will be found." Someone, a girl who knew her, said to her very affectionately, 'Look, queen, today I will take ten rupees, you always pay less money.' Got it. All the time, she was wandering here and there. Saying was moving forward. I was just staring at her. As I was looking at her, she came very close to me and said, ‘Mayco will give me some money, she will keep looking down, well, I look fine, right?’ I smiled a little because of her words and questions With a smile on my face, I took out the money. She did not expect an answer. After that I only saw her once ...
For the next several days, she disappeared. I don't know where she went. I remembered her many times during the train journey. But when he said that he could not see now, he must have gone somewhere else. Evanna I forgot about her too .....
But, today she appeared again on Jogeshwari's platform. My eyes sparkled with joy when I saw her so suddenly. But today she was upset, in a state of ecstasy, sitting motionless, with a slender body, on a sleepy thigh. Feeling we have 'Run out of gas' emotionally and emotionally. At that moment, a girl of her acquaintance who got off the train saw her and raised her hand and asked, "What, today is Niwantanya?" She, too, smiled and replied, gesturing as if the words had become too heavy to speak, "Yes, business is closed today!"
- Lolly
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा