Block... (त्याच्यातली ती):
Block... (त्याच्यातली ती):
आज मला त्याने त्याच्यातल्या तिच्या विषयी सांगितले मग मी क्षणाचाही विलंब न करता त्याला रेखाटून काढले.
सचेत कनिष्कचा जवळचा मित्र. शाळेच्या पहिल्या वर्गापासून एकत्र शिकलेले. कनिष्क अतिशय हुशार मुलगा. नेहमी वर्गात पहिला येणारा अतिशय देखणा. कनिष्क चॉकलेट बॉय असल्यामुळे वर्गात नेहमीच तो सगळ्यांचा लाडका असायचा. खूप वेळा त्याच्याकडे पाहून मुली मोहित व्हायच्या. पण त्याला भूलवेल किंवा त्याने कोणत्या मुलीच्या प्रेमात पडावं अशी मुलगी त्याला अजून सापडली नव्हती. त्याने जुनिअर कॉलेज पूर्ण केलं होतं. कनिष्क सिनियर कॉलेजच्या पहिल्या वर्गाला होता. त्याच्याबरोबर नेहमी शेपूट बनून राहणारा सचेतही होता. कॉलेज मध्ये कनिष्कचा खूप मोठा मुला मुलींचा ग्रुप झाला होता. सगळे खूप धमाल मस्ती करायचे. ठरल्याप्रमाणेच कनिष्क वर्गातही आणि ग्रुप मधेही हुशार आणि लाडका होता.
सिनियर कॉलेज मध्ये सुकन्या ही एकटीच मुलगी
होती जी कनिष्क ला अभ्यासात टक्कर द्यायची. ‘सुकन्या’ मोठ्या शहरात
वाढलेली मुलगी पण तिच्या बाबांची गावाकडे बदली झाल्यामुळे ती गावाकडे आली होती.
कनिष्कच्या घरापासून अगदीच जवळ राहायला आली होती. सुकन्या दिसायला फार सुंदर आणि
सुशील मुलगी, पंजाबी ड्रेस, कपाळावर शोभेल अशी टिकली, कानात झुमके, लांबसडक
केसांची वेणी गुंफलेली अगदी देशी गर्ल. तिला बघून कोणालाच विश्वास बसणार नाही की
ती मोठ्या शहरात वाढली असेल.
खरं तर कनिष्क तिला पहिल्यांदा पाहून तिच्यात हरवून गेला होता. त्याच्या मनात कुठेतरी ती भरून गेली होती. फक्त तेच नाही तर सुकन्यालाही कनिष्क आवडला होता. सगळ्यात मिळून मिसळून राहणारा वर्गात हुशार कोणालाही आवडू शकतो मग सुकन्या तरी अपवाद कशी असेल?
सुकन्या आणि कनिष्क एकमेकांबरोबर
अभ्यासाच्या गोष्टी करायचे नंतर नंतर ते जगातल्या कोणत्याही विषयावर चर्चा करू
लागले. त्याचदरम्यान ते एकमेकांच्या कधी जवळ आले आणि प्रेमात पडले ते त्यांनाही
कधी उमगलं नाही. दोघे नेहमी एकत्र राहायचे फिरायला जायचे. चहा कॉफी बरोबर ते दोघे
बरेच काही शेर करायचे. दोघांच्या प्रेम प्रकरणामुळे त्यांनी कधीच आपल्या मित्रांना
दूर केलं नाही आणि कधी कोणाला दुखावलं देखील नाही पण दुखावला मात्र एकच मित्र तो
म्हणजे सचेत कनिष्क चा लंगोटी दोस्त.
सुकन्या आणि कनिष्क च्या प्रेमामुळे सचेत दुखावला गेला होता. सुकन्याच्या येण्याने कनिष्क त्याच्यापासून लांब गेला असं त्याला वाटत असतं. नेहमी सुकन्याला सचेत कनिष्क पासून दूर करण्याचा नाना प्रयत्न करायचा. त्या दोघांना एकमेकांना भेटू देत नव्हता . जवळ येवू देत नव्हता. सतत सुकन्या विषयी त्याच्या मनात द्वेषाची भावना निर्माण होत होती.
एक दिवस सचेतच्या डोक्यात वेगळंच वारं घुमायला लागतं. तो कनिष्कला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचं म्हणून लांब एकांतात घेवून जातो. कनिष्क ही त्याचं मन राखून सुकन्याला न भेटताच त्याच्याबरोबर निघून जातो.
सचेत आणि कनिष्क दोघेच सूर्यास्ताच्या वेळी नदीकाठी बसतात. कनिष्क सचेताला विचारतो की, काय झालं? तू हल्ली काहीतरी विक्षिप्त का वागतोय आणि काय सांगायचं होतं जे मला तू इकडे घेवून आलास, सुकन्या माझी वाट पाहत असेल, सांग आता काय झालं? बराच वेळ मौन धारण केलेला सचेत सुकन्येचं नाव एकताच कनिष्क वर भयंकर रागवतो आणि त्याला ओरडून म्हणतो, ‘बंद कर सुकन्या पुराण, मला ती नाही आवडत. तू पहिल्यापासून माझा आहेस आणि फक्त माझाच पाहिजे. ही सुकन्या कुठून आली मध्येच. तिला मनातून काढून टाक, मी आहे ना तुझ्यावर प्रेम करायला. मला तू फार आवडतोस. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत.’ हे एकताच कनिष्कला मळमळल्या सारखं व्हायला लागतं, त्याला सचेतची घीन यायला लागते. तो तिथून काहीच न बोलता पळ काढायला लागतो तोच सचेत त्याला पकडून घट्ट मिठी मारतो. कनिष्क त्याला ढकलून घाबरून पळून जातो.
कनिष्कला सचेत मधली ती दिसल्यानंतर तो त्याच्या आयुष्यातून सचेतच्या मैत्रीचा chapter कायमचा block करून टाकतो.
-Lolly
English Translation:
Today he told me about her in him then I pulled him out of the line without a moment's delay.
A close friend of Sachet Kanishka. Learned together from the first class of school. Kanishka is a very smart boy. Very handsome always coming first in the class. As Kanishka was a chocolate boy, he was always the darling of everyone in the class. The girls would be fascinated by seeing him so many times. But he had not yet found a girl whom he could forget or fall in love with. He had completed junior college. Kanishka was in the first class of senior college. He also had a vigilante who was always with him. In college, Kanishka had a very large group of boys and girls. Everyone had a lot of fun. As planned, Kanishka was smart and affectionate both in the class and in the group.
In senior college, Sukanya was the only girl who challenged Kanishka in her studies. Sukanya is a girl who grew up in a big city but came to the village after her father moved to the village. She had come to live very close to Kanishka's house. Sukanya looks very beautiful and good-natured girl, Punjabi dress, tikli that will be adorned on the forehead, earrings in the ears, long hair braided even a country girl. No one would believe that she grew up in a big city. In fact, Kanishka was lost in her when he first saw her. Somewhere in his mind it was filled. Not only that, Sukanya also liked Kanishka. Anyone who is smart in the classroom can be liked by everyone, so how can there be an exception even if it is dry?
Sukanya and Kanishka used to do study things with each other and later they started discussing any topic in the world. In the meanwhile, they never knew when they would get close and fall in love. The two always went for walks together. They both shared a lot with tea and coffee. Due to their love affair, they never took their friends away and never hurt anyone, but the only friend who got hurt was Sachet Kanishka's nappy friend.
Sukanya and Kanishka's love had hurt consciously. He used to think that Kanishka had gone away from him due to the arrival of Sukanya. Nana always tried to keep Sukanya away from the conscious Kanishka. The two were not allowed to meet each other. He was not allowed to come near. He was constantly feeling hatred for Sukanya.
One day, a different wind starts blowing in Sachet's head. He takes Kanishka away for a long time to tell him something very important. Kanishka keeps his mind and leaves with Sukanya without meeting him.
Both Sachet and Kanishka sit by the river at sunset. Kanishka asks Sacheta, what happened? Why are you doing something weird these days and what did you mean to say that you brought me here, Sukanya is waiting for me, tell me what happened now? The name of the conscious Sukanya, who has been silent for a long time, gets angry at Kanishka and shouts at him, ‘Stop Sukanya Purana, I don't like her. You are mine from the beginning and only I want you. Where did this dryness come from? Get her out of your mind, I love you. I love you so much I can't live without you. ' He starts to run away without saying anything. He grabs him and hugs him tightly. Kanishka pushes him away and runs away.
When Kanishka sees her in Sachet, he permanently blocks the chapter of Sachet's friendship from his life.
-Lolly
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा