विद्रोह....... २
विद्रोह....... Rebellion... पुढे कित्येक दिवस, महिने कमली घराकडे फिरकलीच नाही. खूप लोकांकडे वाट्टेल त्या पद्धतीने तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण कमली काही सापडलीच नाही. रोज सकाळी कमलीच्या येण्याचा भास व्हायचा. कित्येक वेळा तर झोपेतच दचकून उठायचे. कमली रोज नवीनवीन गोष्टी सांगत राहायची भलेही त्या कोणी एकूण घेवू अगर नाही घेवू. एक दिवशी घरमालकीण आणि मी तिच्या सासरी गेलो जिथून तिला हाकलून दिलं होतं, तिला घरातून बाहेर काढण्याचं कारण म्हणजे कमलीला मुल बाळ होत नव्हतं. तिच्या सासरच्यांना घराण्याला वारस हवा होता. त्यामुळे कमलीला बेघर केलं होतं. कमली असतानाच कमलीच्या नवऱ्याने लग्न केलं होतं म्हणून कमलीच्या मनावर परिणाम झाला होता. आम्ही तिच्या सासरी चौकशी केली पण तिच्या घरच्यांनी काहीच माहिती दिली नाही उलट आम्हाला तिथून हुसकून दिलं. आम्ही दोघी तिथून निघालो पण जड मनाने. रस्त्यावरून जात असताना एक बाई आम्हाला हळूच इशारा करून घरात या म्हणाली आम्ही पण लगेच इकडे तिकडे बघून तिच्या घरात शिरलो. मनात शंका होतीच पण त्या बाईने जे सांगितले ते एकून मन सुन्न पडून गेलं. डोकं भदीर पडलं ...