पोस्ट्स

#Beautiful लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Block... (त्याच्यातली ती):

इमेज
  Block... (त्याच्यातली ती): आज मला त्याने त्याच्यातल्या तिच्या विषयी सांगितले मग मी क्षणाचाही विलंब न करता त्याला रेखाटून काढले. सचेत कनिष्कचा जवळचा मित्र. शाळेच्या पहिल्या वर्गापासून एकत्र शिकलेले. कनिष्क अतिशय हुशार मुलगा. नेहमी वर्गात पहिला येणारा अतिशय देखणा. कनिष्क चॉकलेट बॉय असल्यामुळे वर्गात नेहमीच तो सगळ्यांचा लाडका असायचा. खूप वेळा त्याच्याकडे पाहून मुली मोहित व्हायच्या. पण त्याला भूलवेल किंवा त्याने कोणत्या मुलीच्या प्रेमात पडावं अशी मुलगी त्याला अजून सापडली नव्हती. त्याने जुनिअर कॉलेज पूर्ण केलं होतं. कनिष्क सिनियर कॉलेजच्या पहिल्या वर्गाला होता. त्याच्याबरोबर नेहमी शेपूट बनून राहणारा सचेतही होता. कॉलेज मध्ये कनिष्कचा खूप मोठा मुला मुलींचा ग्रुप झाला होता. सगळे खूप धमाल मस्ती करायचे. ठरल्याप्रमाणेच कनिष्क वर्गातही आणि ग्रुप मधेही हुशार आणि लाडका   होता.  सिनियर कॉलेज मध्ये सुकन्या ही एकटीच मुलगी होती जी कनिष्क ला अभ्यासात टक्कर द्यायची. ‘सुकन्या’ मोठ्या शहरात वाढलेली मुलगी पण तिच्या बाबांची गावाकडे बदली झाल्यामुळे ती गावाकडे आली होती. कनिष्कच्या घर...