पोस्ट्स

Authentic लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लाखाचे बारा कसे वाजतात? २ How about twelve lakhs? : 2

इमेज
 लाखाचे बारा कसे वाजतात? :   फार वर्षापूर्वी आणि काही भागात आजही पोलीस कसलिही शहानिशा न करता लोकांना   गुन्हेगार ठरवते. माणसाच्या श्रीमंतीवरून त्याची लायकी ठरवली जाते. अंगावरच्या कपड्यावरून त्याची श्रीमंती ठरवली जाते. तशीच काहीशी गोष्ट गोकुळ बरोबर घडली. गोकुळ गरीब शेतकरी, दारुडा त्यामुळे अंगावरची कपडे अगदीच स्वच्छ असल्यामुळे त्याला आज जेल मध्ये पोलिसांनी सडायला भाग पडलं.     चोरीचा ‘च’ ही माहीत नसलेला गोकुळ आज त्याच्या परिस्थितीमुळे आणि दारूमुळे तो जेल मध्ये बसला होता.       एरवी पिवून झुलत हिंडणारा गोकुळ आज तुरुंगात निश्चिंत पडला होता. मात्र त्याच्या घरच्यांचे धाबे दणाणले होते. कधीच कोर्ट कचेरीची पायरी न ओलांडलेले गोकुळाच्या घरचे घाबरून गेले होते. आता काय करायचं गोकुळ ला कसं बाहेर काढायचं. बायका पोरं गावच्या सरपंचाकडे जावून त्यांना सोडवण्यासाठी मदत मागत होते. गावाच्या पुढाऱ्यांनी मदत केली पण पैशांची चांगलीच मागणी केली. आता पैसा फेकल्याशिवाय काहीच होणार नव्हतं हे गोकुळच्या घरच्यांना कळून चुकलं होतं. गोकुळने आणि त्यांच्या घरच्यांनी...

जन्मठेप : ३ Birth control : 3

इमेज
जन्मठेप : ३  Birth control :3  बराच वेळ झालं शेळ्या बेवारस सारख्या चरत राहिल्या आणि आपल्याबरोबर असणारी व्यक्ती कुठे दिसेना म्हंटल्यावर शेळ्यांनी थेट घराचा रस्ता पकडला आणि भरधाव घेत सगळ्या शेळ्या घरी पोहचल्या. शेळ्या घरी आल्या पण सुकन्या कुठे दिसेना म्हणून घरचे तिला शोधायला निघाले. जंगलाच्या दिशेने जाताना सुकन्या तिच्या घरच्यांच्या नजरेस पडली. अतिशय घाबरलेली आणि उधवस्त अवस्थेत ती त्याच घरासमोर बसून होती जिथे ती पाणी प्यायला गेली होती. ५५ वर्षाच्या नराधमाने भोळ्या भाबड्या सुकन्येचे जागो जागी लचके तोडले होते. तिच्यावर अत्याचार करून रक्तभम्बाळ केलं होतं. सुकन्या थर थर कापत होती ती त्याच अवस्थेत गुडगे पोटाशी घालून हमसून हमसून रडत होती. घरच्यांनी तिची ती अवस्था बघून लगेच तिला जवळ करून शांत केलं. सुकन्याही घरचे आल्यावर थोडी शांत झाली आणि घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. घरच्यांनी त्या नराधमाचा शोध घेतला पण तो लगेच राहत्या घरून पळून गेला होता. घरच्यांनी सुकन्येला धीर दिला आणि लगेच तिला जवळच्या पोलीस स्टेशनला घेवून जावून गुन्हा दाखल केला. पोलिस अधिकार्यांनी ही घटनेला गम्भिर्य...