जन्मठेप : ३ Birth control : 3
जन्मठेप : ३ Birth control :3 बराच वेळ झालं शेळ्या बेवारस सारख्या चरत राहिल्या आणि आपल्याबरोबर असणारी व्यक्ती कुठे दिसेना म्हंटल्यावर शेळ्यांनी थेट घराचा रस्ता पकडला आणि भरधाव घेत सगळ्या शेळ्या घरी पोहचल्या. शेळ्या घरी आल्या पण सुकन्या कुठे दिसेना म्हणून घरचे तिला शोधायला निघाले. जंगलाच्या दिशेने जाताना सुकन्या तिच्या घरच्यांच्या नजरेस पडली. अतिशय घाबरलेली आणि उधवस्त अवस्थेत ती त्याच घरासमोर बसून होती जिथे ती पाणी प्यायला गेली होती. ५५ वर्षाच्या नराधमाने भोळ्या भाबड्या सुकन्येचे जागो जागी लचके तोडले होते. तिच्यावर अत्याचार करून रक्तभम्बाळ केलं होतं. सुकन्या थर थर कापत होती ती त्याच अवस्थेत गुडगे पोटाशी घालून हमसून हमसून रडत होती. घरच्यांनी तिची ती अवस्था बघून लगेच तिला जवळ करून शांत केलं. सुकन्याही घरचे आल्यावर थोडी शांत झाली आणि घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. घरच्यांनी त्या नराधमाचा शोध घेतला पण तो लगेच राहत्या घरून पळून गेला होता. घरच्यांनी सुकन्येला धीर दिला आणि लगेच तिला जवळच्या पोलीस स्टेशनला घेवून जावून गुन्हा दाखल केला. पोलिस अधिकार्यांनी ही घटनेला गम्भिर्य...