अव्यक्त.... कांती नारायण
अव्यक्त ...
आपल्या सुप्त भावनांना मनातली मनात दाबून ठेवणारी कांता स्वतःचे मानसिक संतुलन हरवून बसली होती. तरीही तिच्यापुढे नारायण तिच्यापासून तोडून का वागत होता? याचं उत्तर काही मिळायला तयार नव्हतं.
नारायण स्वभावाने जरी गरीब असला अन कामाशी काम ठेवणारा असला तरी लग्नाअगोदर त्याच्या कडून काही चुका घडल्या होत्या. त्याच चुकांची फळ त्याच्याबरोबर कांतीदेखील भोगत होती.
नारायण ट्रक ड्रायवर
असल्यामुळे त्याला बऱ्याच वेळा रात्री घरी परत येणं जमत नसायचं. एके दिवशी
थंडीच्या दिवसात नारायण ट्रक मध्ये माल घेवून जात असताना एका अनोळखी ठिकाणी
ढाब्यावर थाबतो रात्र झाल्यामुळे तो तिथे मुक्काम करतो.
थंडीच्या दिवसात ढाब्यावर शेकोटीची सोय होती म्हणून तो बऱ्याच वेळ पर्यंत शेकोटी समोर बसून राहतो. त्याच वेळी तिथे अतिशय देखणी, गोरी गोमटी बाई येवून नारायणला अगदीच चिकटून बसते. नारायण लाजणं बाजूला सरकायला जातो तर ती त्याला धरून जागीच बसवते, अन ‘चला की मी थोडी गरमी देते’ म्हणून त्याच्या अंगाला झोंबायला लागते. नारायण तिला धीटकारून बाजूला करतो आणि गाडीत जावून बसतो. पण त्याच्या डोळ्यासमोर सतत त्या बाईचा चेहरा येतो. त्या बाईकडे जावू की नको अशी त्याच्या मनात घालमेल चालू होते. ‘शेवटी पुरुष’! मनाच्या इच्छेवर मुरड नाही घालू शकत. तो उठून थेट त्या बाईकडे जातो... बस ती रात्र त्याच्या आयुष्याची काळरात्र ठरते आणि त्याचं आयुष्य उधवस्त करते.
नारायण लग्नाच्या अगोदर आजारी असल्यामुळे दवाखान्यात जातो. तेंव्हा काही तपासण्या करून घेतो. त्याचे रिपोर्ट लग्नंतर हैद्राबादला जाताना मिळतात रिपोर्ट पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याच्या डोळ्यासमोर कांताचा चेहरा सरसर सरकून निघून जातो. त्याला काय करावं सुचत नाही तो झपकन खाली बसून हमसून हमसून रडायला लागतो. त्याला कांताच्या समोर कसं जायचं? तिला काय सांगायचं? समाज काय म्हणेल? असे असंख्य प्रश्न त्याच्या समोर आ वासून बसतात. बऱ्याच विचारानंतर तो एका निर्णयापर्यंत येवून पोहचतो, की ‘आता कांताच्या जवळ कधीच जायचं नाही’. त्याचा आजार कांताला होवू नये आणि कळू पण नये म्हणून तो तिच्यापासून लांब रहायला सुरवात करतो. कांता सोडून जाईल, ती का गेली म्हणून लोकं त्याला विचारतील, त्याच्या आजाराची सगळीकडे चर्चा होईल, गावात सगळे त्याला वाळीत टाकतील, त्याची टिंगल टवाळी करतील म्हणून तो जमेल तेवढा वेळ घराबाहेर राहण्याचा प्रयत्न करतो. नारायण HIV positive असतो.
शेवटी माणूस समाज, मानमर्यादा, प्रतिष्ठा यांना जपता जपता संपून जातो. मागे राहतात त्या फक्त सुप्त आणि अव्यक्त अशा इच्छा...
- Lolly
English Translation :
Kanta, who was suppressing her latent feelings in her mind, had lost her mental balance. Yet why was Narayan breaking away from her in front of her? The answer was not ready.
Although Narayan was poor by nature and hardworking, he had made some mistakes before marriage. Kanti was also suffering from the same mistake.
Since Narayan was a truck driver, he could not return home at night. One day, on a cold day, while Narayan was carrying his goods in a truck, he stopped at an unknown place on a dhaba and spent the night there. He used to sit in front of the fire for a long time as there was a fire on the dhaba on a cold day. At the same time, a very beautiful, fair-skinned woman comes and clings to Narayan. When Narayan Lajanam moves to the side, she grabs him and sits on the spot. Narayan pushes her aside and gets into the car. But the woman's face is constantly in front of his eyes. He was thinking whether to go to the woman or not. ‘Finally men’! Murad cannot be added to the will of the mind. He gets up and goes straight to the woman...
but that night becomes the darkest night of his life and destroys his life.
Narayan goes to the hospital as he is ill before marriage. So let's do some checks. His reports are received on his way to Hyderabad after marriage. Kanta's face slips away before his eyes. He doesn't know what to do, he just sits down and starts crying. How did he get in front of Kanta? What do you want to tell her? What will society say? Numerous such questions come to mind. After much thought, he comes to the conclusion that he should never go near Kant again. He starts to stay away from her so that Kanta doesn't get sick and doesn't know. Kanta will leave, people will ask her why she is gone, her illness will be discussed everywhere, everyone in the village will throw her in the sand, tingle her, so she tries to stay out of the house as long as she can. Narayan is HIV positive.
In the end, man ends up preserving society, dignity and prestige. Only those latent and latent desires that remain behind ...
- Lolly
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा