राघिणी: Raghini
राघिणी: Raghini राघिनी दिसायला देखणी उंचपुरी सावळ्या रंगाची. लहानपण अगदीच लाडात गेलेलं आई बाबांची एकुलती एक मुलगी. तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेली. तिला इंजिनियर व्हायचं होतं आणि परदेशात नोकरीला जायचं होतं. बाबा मिलिटरी ऑफिसर. आई House wife. राघिनी कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला असतानाच तिच्या आणि तिच्या सुखी घराला ग्रहण लागलं आणि तिचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. राघिनीने कॉलेज सोडलं आणि आर्मी भरतीची जोरदार तयारी करू लागली. कधी जेवणाचं तर सोडाच पण पाण्याचा तांब्या पण न उचलणारी राघिनी आज अचानक आर्मी भरतीसाठी एवढे कष्ट का घेतेय हे कोणालाच उमगत नव्हतं? अहोरात्र ती भरतीची तयारी करत होती. अथक परिश्रमातून शेवटी तिला यश मिळालं. ट्रेनिंगच्या कालावधीत तिने खूप मेहनत घेतली आणि तिचे बाबा ज्या पोष्ट वर होते त्याच पोष्ट वर ती रुजू झाली. आर्मी ऑफिसर मिस राघिनी. राघीनीला कोणीतरी घेरलं आहे तिला कोणीतरी मारायचा प्रयत्न करतंय तिच्या आई ला कोणीतरी ढकलून देतंय, बाबांवर कोणीतरी लाठीन...