आज धंदा बंद! :

 

आज धंदा बंद! : part 1

 

    हो आज ती निवांत बसली होती जोगेश्वरीच्या Platform वर, कसलीच धावपळ नाही, दगदग नाही, निश्चिंत, निरागस चेहरा घेऊन एकटीच बसली होती ती भुतासारखी. आज तिला काय झालं होतं काय माहित? तिला तसी बसलेली बघून मनात असंख्य प्रश्न येऊन गेले, की काय झालं असेल? कोण काय बोललं असेल का? कोणी तिला त्रास दिला असेल का? कोणी तिच्याबरोबर... छे काहीतरीच काय...



 

 खरंतरं बऱ्याच दिवसाची इच्छा होती माझ्या मनात तिला रेखाटायची पण वेळेअभावी सतत त्या इच्छेला मी मारत आली पण आज काही रहावलच नाही...

‘डिंपल’ दिसायला प्रचंड देखणी, गोरी गोमटी, उंच पुरी तरी साधारण साडेपाच फुट असेलच. गोल गरगरीत डोळे त्यात गच्च भरलेलं काजळ, लांब सडक नाक आणि चार बोटांनी पण न व्यापणारं कपाळ अशी ती सडपातळ बांध्याची लाल साडीत एकदमच खुलून दिसायची. जशी पंजाबी ‘कुडी.’ मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं काही दिवसांपूर्वी, ते पण जोगेश्वरीच्याच Platform वरून ट्रेन मध्ये चढताना. संध्याकाळची वेळ साधारण ८.३० ते ९.०० च्या दरम्यान. योगा- योगाने ट्रेन मध्ये त्या दिवशी मला बसायला जागा मिळाली होती. ट्रेन मध्ये बसायला जागा मिळणं म्हणजे चेंगराचेंगरी आणि धक्काबुक्कीच्या जगातून मिळालेला मोकळा श्वास. त्याच मोकळ्या श्वासाचा आनंद लुटत मी खिडकीतून बाहेर बघत होती. काहीवेळाने त्या आनंदाची जागा वेगळ्याच स्वप्नांनी घेतली होती. त्या स्वप्नांच्या लहरीत हरवलेली असतानाच अचानक माझ्या कानावर ‘ठप्प’ असा आवाज आला अन् माझी लागलेली तंद्री मोडली. 

 आवाजाच्या दिशेने पाहिलं तर मला समोर डिंपल दिसली. नावाप्रमाणेच तिच्या गालावर डिंपल (खळी) पडत होती. तिने लाल रंगाची साडी घातली होती त्याला काळ्या रंगाची किनार तर अजूनच शोभून दिसत होती. बहुतेक तिला लाल, काळा रंग ज्यास्त आवडत असावा. तिने पोटासकट बेंबीचं आणि बऱ्याच काही सामानाचं दर्शन व्हावं अशा पद्धतीने पदर खांद्यावर टाकला होता. ब्लाऊज ला तर पाठीमागे दोन दोऱ्यांशिवाय बाकी काहीच अस्तित्व नव्हतं. तिने लांब लचक केसांचा बुचडा बांधून अर्धा मोकळा सोडला होता. कानात एक-एकच साखळी, पण खांद्यापर्यंत लोंबत होती. चेरीसारखा लालबुंद आणि मधाळ रस टपकावा असा ओठांवर साज तिने चढवला होता. तिला बघून कोणताही पुरुष मोहित व्हावा असाच तिचा तोरा होता......

डिंपल कोण होती? कुठून आली होती? आणि परत कुठे गेली या प्रश्नांची उत्तरे पुढच्या ब्लॉग मध्ये पाहू....

                                                             

                                                                 - Lolly

English Translation: 

 

Yes, today she was sitting alone on Jogeshwari's platform, no rush, no rush, she was sitting alone with a calm, innocent face like a ghost. Do you know what happened to her today? Seeing her sitting like that, many questions came to my mind, what could have happened? Who would have said that? Has anyone bothered her? Someone with her ... what the heck ...
               
               In fact, I wanted to draw her in my mind for many days, but due to lack of time, I kept beating that desire, but today there is nothing left ...
 
               The ‘dimples’ must have looked huge, fair-skinned, tall, but about five and a half feet tall. Her eyes were wide open, her eyes were full of soot, her nose was long, and her forehead was not covered with four fingers. Just like the Punjabi ‘Kudi.’ I first saw her a few days ago, while boarding the train from Jogeshwari's platform. Evening time is between 8.30 am and 9.00 am. Yoga- Yoga had given me a place to sit in the train that day. Getting a seat on a train is a breath of fresh air from the world of hustle and bustle. I was looking out the window, enjoying the same breath. Sometimes that happiness was replaced by different dreams. While I was lost in the wave of those dreams, I suddenly heard a ‘stop’ sound and my drowsiness broke. Looking in the direction of the voice, I saw a dimple in front of me. As the name suggests, dimples were falling on her cheeks. She was wearing a red sari and her black fringe still looked beautiful. Most likely she prefers red, black. She had placed the padar on her shoulders in such a way that she could see the belly button and many other things. The blouse had nothing but two ropes on the back. She had tied up a bunch of long elastic hair and left it half free. A single chain in the ear, but hanging up to the shoulder. She had a reddish-cherry-like cherry on her lips. Her Torah was such that any man should be fascinated by seeing her.
 
               Who was Dimple? Where did it come from And let's see the answers to these questions again in the next blog ....
 
 
                          
-    Lolly 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी हक्क: Tribal Rights : 1

जन्मठेप : १ Birth control: 1

आदिवासी हक्क : २ Tribal Rights 2