पोस्ट्स

Slow down लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जन्मठेप : २ Birth control: 2

इमेज
  जन्मठेप : २   Birth control रोजच्या सारखीच आजही सुकन्या नटून थटून शेळ्या घेवून शेतात चारायला आली होती, आजही छान हसून आणि नाचून दिवस गोड करून पुढे शेळ्या चारायला निघून गेली. पण आज जे तिच्या समोर वाडून ठेवलं होतं ते ना तिला माहित होतं ना आम्ही कधी कल्पना केली होती...... शेतात चरता चरता शेळ्यानी आज अचानक जंगलाकडे धाव घेतली. सैराट झालेल्या शेळ्यांना आवरता आवरता थकून गेलेली सुकन्या एका झाडाखाली बसली होती. शेळ्यांच्या पाठीमागे पळून पळून तहान लागल्यामुळे ती पाण्याने भरलेली बॉटल शोधू लागली पण पळता पळता बॉटल कुठेतरी पडली तिला समजलंच नाही. तहानेने घसा सुकून गेला होता तिला आता पाण्याशिवाय राहवेना म्हणून तिने पुन्हा शेळ्या घराच्या दिशेने हकलून काढल्या. जंगलातून घरी येताना तिला एक छोटंसं घर दिसलं, तहानेने व्याकूळ झालेल्या सुकन्येला वाटलं थोडंसं पाणी मागून पहावं, घरी पोहोचेपर्यंत तहान तरी भागेल, या आशेने ती त्या छोट्याश्या घरासमोर गेली दरवाजा उघडाच होता पण बाहेर कोणी दिसत नव्हतं म्हणून ती घरात डोकावण्यासाठी पुढे सरसावली तोच एक ५०,५५ वर्षाचा माणूस तिच्या समोर येवून थांबला. साधी ...

जन्मठेप : १ Birth control: 1

इमेज
   जन्मठेप : १    आजपर्यंत जे पण ब्लॉगवर लिहिलं ते सगळं वास्तवाशी सांगड घालून लिहल आहे. म्हणजेच अवतीभवती घडलेल्या गोष्टी ज्या मी अनुभवल्या त्या तुमच्यासमोर मांडल्या आहेत. आजही अशीच मी अनुभवलेली गोष्ट तुमच्यासमोर मांडणार आहे.       जन्मठेप... रोज डोळ्यासमोर ये जा करणाऱ्या १६ वर्षाच्या चिमुरडीची ही गोष्ट. वयाने लहान होतीच पण सुकन्या गतिमंद देखील होती. त्यामुळे तिने कधी शाळेचा श ही कधी अभ्यासला नाही. रोज छान नटून थटून राहायचं छान छान खायचं आणि रानात शेळ्यामागे जायचं हेच काम ती रोज करत असायची. अधून मधून ती घरचा स्वयंपाक सुद्धा अगदी सुगरणी सारखा करायची. माझा आणि तिचा परिचय एक ते दीड वर्षाचा. कधी बोलणं चालणं नाही व्हायचं पण दारातून येता जाता मात्र हसून दाखवायची. तर कधी घराच्या अवती भवती शेळ्या चारताना नाचून दाखवायची. कधी जवळ नाही आली नेहमी आपलं लांबून लांबून मनोरंजन करायची. आम्हाला तिची आता सवय लागली होती एखाद दिवशी ती हसली नाही किंवा नाचली नाही की कळून जायचं की तिचं आणि तिच्या आईचं काहीतरी आज वाजलं. पण असं खूप कमी वेळा व्हायचं. सुकन्या नेह...