खेळ मांडला नियतीने
खेळ मांडला नियतीने : Destined to play the game:
देवाशिष स्वतःच्या दुनियेत (कल्पनाविश्वात) जगणारा मुलगा. दिसायला देखणा. सावळ्या रंगाचा.फूट उंचीचा पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकायला असतो. अतिशय श्रीमंतीत वाढलेला देवाशिष पण साधा भोळाच स्वभावाचा. एकलकोंड्या देवाशिष श्रीमंतीच्या प्रदर्शनापासून ४ हात लांब असतो.
एक दिवस अनवधानाने ओळख झालेल्या मुलीच्या प्रेमात तो पडतो. नेमकी त्याच वेळेला त्याचं आयुष्य एक वेगळं वळण घेतं.
देवाशिषचे आयुष्या हसरी बरोबर सुखात आनंदात चाललेलं असतं. पण सुखाला नजर न लागावी असं सुख काय कामाचं.आयुष्याच्या वाटेवर प्रेमाच्या नात्याला एक नवीन नाव मिळणार तोच नियतीची नियत बदलते. आणि देवाशिषच्या प्रेमाला ग्रहण लागतं. अन् हसरीची साथ कायमची सुटते.
आनंदाच्या क्षणांनी भरलेलं देवाशिषचं आयुष्य पुन्हा एकलकोंडं बनून जातं. हसरीचं त्याच्या आयुष्यातून एकाकी गायब होणं त्याच्या आयुष्याला धक्का देवून जातं. हसरी त्याच्या आयुष्यात हवेच्या झुळकेप्रमाणे येवून निघून जाते. पण मनात असंख्य प्रश्नांचं काहूर सोडून जाते. हसरी कुठून आली? कशी आली? त्याच्याच आयुष्यात का आली? आणि निघून पण गेली पण कुठे कशी कोणालाच थांग पत्ता लागत नाही. हसरीला देवाशिष शिवाय कोणीच पाहिलेलं नसतं म्हणून देवाशिष अजूनच हैराण असतो. त्याच्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं कि हसरी कोण होती?
हसरीच्या अचानक जाण्यानं तुटून पडलेला देवाशिष प्रकृती सुधारण्यासाठी पुण्याला निघून जातो.डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार देवाशिष एका आजाराला बळी पडला होता. हसरी नावाची कोणीच व्यक्ती या जगात अस्तित्वात नव्हती. तो त्याच्या कल्पनेत जगत होता. हसरी त्याच्या कल्पनेच्या जगातली प्रतिकृती होती.
देवाशिष पुण्यात स्थिरावला होता. त्याने ठरवलं होतं की त्याचं अर्धवट राहिलेलं शिक्षण तो पुण्यातच पूर्ण करेल. पण देवाशिषच्या आईने ठरवलं होतं की आता देवाशिषचे लग्न करायचे. ती त्याच्यासाठी एक मुलगी शोधते आणि तिचा फोटो देवाशिष ला पाहायला लावते. देवाशिषने त्याचा पुसून टाकलेला भूतकाळ पुन्हा त्याच्या समोर उभा राहतो जेंव्हा आईने पाहायला लावलेला मुलीचा फोटो तो पाहतो, ती तीच मुलगी असते जी त्याच्या कल्पनेच्या दुनियेत त्याला हरवून टाकते.....
-Lolly
English Translation :
Devashish is a boy living in his own world. Handsome Shadow color. Feet height is to be learned in the second year of graduation. Devashish, who grew up in a very rich but simple nature. Ekalkondya Devashish is 4 hands away from the display of wealth.
One day he falls in love with a girl he inadvertently introduced. At the same time, his life takes a different turn.
Devashish's life would have been happier and happier. But what is the use of happiness that should not be overlooked?
Destiny changes as the love affair gets a new name on the way to life. And the love of Devashish begins to eclipse. Anhasari's company is gone forever.
Filled with happy moments, Devashish's life becomes lonely again. Hasari's lonely disappearance from his life shocks his life. Husari comes and goes like a breeze in his life. But it leaves a lot of questions in the mind. Where did the laughter come from? How come Why did it come into his own life? And gone, but no one knows where. Since no one has seen Hasari except Devashish, Devashish is still annoyed. No one had the answer to his question, who was Husari?
Devashish, who was devastated by Husari's sudden departure, leaves for Pune to recover. According to doctors, Devashish had fallen ill. There was no such thing as a laughing stock in this world. He was living in his imagination. Husari was a replica of his imaginary world.
Devashish was settled in Pune. He had decided that he would complete his partial education in Pune. But Devashish's mother had decided to marry Devashish now. She finds a girl for him and makes Devashish look at her photo. His past, erased by Devashish, stands in front of him again when he sees the photo of the girl his mother made him look at, it is the same girl who loses him in the world of his imagination .....
-Lolly
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा