खेळ मांडला नियतीने
खेळ मांडला नियतीने : Destined to play the game: देवाशिष स्वतःच्या दुनियेत (कल्पनाविश्वात) जगणारा मुलगा. दिसायला देखणा. सावळ्या रंगाचा.फूट उंचीचा पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकायला असतो. अतिशय श्रीमंतीत वाढलेला देवाशिष पण साधा भोळाच स्वभावाचा. एकलकोंड्या देवाशिष श्रीमंतीच्या प्रदर्शनापासून ४ हात लांब असतो. एक दिवस अनवधानाने ओळख झालेल्या मुलीच्या प्रेमात तो पडतो. नेमकी त्याच वेळेला त्याचं आयुष्य एक वेगळं वळण घेतं. देवाशिषचे आयुष्या हसरी बरोबर सुखात आनंदात चाललेलं असतं. पण सुखाला नजर न लागावी असं सुख काय कामाचं. आयुष्याच्या वाटेवर प्रेमाच्या नात्याला एक नवीन नाव मिळणार तोच नियतीची नियत बदलते. आणि देवाशिषच्या प्रेमाला ग्रहण लागतं. अन् हसरीची साथ कायमची सुटते. आनंदाच्या क्षणांनी भरलेलं देवाशिषचं आयुष्य पुन्हा एकलकोंडं बनून जातं. हसरीचं त्याच्या आयुष्यातून एकाकी गायब होणं त्याच्या आयुष्याला धक्का देवून जातं. हसरी त्याच्या आयुष्यात हवेच्या झुळकेप्रमाणे येवून निघून जाते. पण मनात असंख्य प्रश्नांचं काहूर सोडून ज...