विद्रोह.......
विद्रोह....... Rebellion .......
हो मला विद्रोह करायचाय....
दुःखाच्या आणि धोक्याच्या आगीत व्हरपळलेली ती मार्ग दिसेल तिकडे धाव घेत होती. पुरुषप्रधान संस्कुतीला कंटाळलेली ती बदल्याच्या भावनेनी पिसाळली होती. प्रेम, माया, जिव्हाळा या गोष्टीची तिला प्रचंड चीड येत होती. स्व:तपासूनच दूर जाऊ पाहत होती. सरलेल्या भूतकाळावर मात करण्यासाठी तिने भटकंती सुरु केली, फिरता फिरता ती एका छोट्याशा गावात येऊन पोहचली. एक छोटसं गाव आदिवासी होतं सगळा ती काही दिवस रमली तिथे पण नंतर तिला वास्तवाची खरी ओळख पटली. ‘कमली’ बरोबर तिची ओळख झाली.
‘कमली’अक्कल शून्य असल्यासारखी होती. फाटकी साडी, केसांच्या जटा झालेल्या, कपाळावर लाल भडक टिकली, लांबच लांब दात ओठांच्या बाहेर निघालेले, पिंगट डोळे, काळ्या रंगाची आणि मध्यम उंचीची कमली रोज घराघरात जाऊन शिळं मागून खायची. तिची आणि कमालीची हळू हळू मैत्री वाढत चालली होती, कमालीच्या नवऱ्याने कमलीला सोडली असं तिला तिच्या घरमालकीणी कडून समजलं. कमली अगोदर चांगली होती सुंदर रहायची आणि दिसायची सुद्धा पण नवऱ्याने सोडल्यापासून तिच्या डोक्यावर परिणाम झाला असं शेजारच्या बायका सांगत होत्या.‘ती’आणि ‘कमली’ खूप गप्पा मारायच्या. गप्पा मारता मारता कमालीला काहीतरी आठवल्यासारखं ती मागितलेल्या शिळ्या भाकरीची पिशवी आणि भाजीसाठी असणारी तवली घेऊन ती पळ काढायची. कोणी आवाज दिला काय आणि नाही दिला काय तिला काहीच फरक नाही पडायचा ती सरळ धूम ठोकायची.
कमली सकाळी ९ वाजता यायची शिळ्या भाकरी भात मागायला तिचा रोजचा टाईम ठरलेला असायचा. एकदिवस घड्याळ त्याचा टाईम बदलेल पण कमालीचा नाही. कमलीचा आवाज आलाकी समजायचं ९ वाजले. कमली एका विशिष्ट सुरात घरमालकीनीला आवाज द्यायची भले घरमालकीन जवळ असली तरी तिला आवाज दिल्याशिवाय चैन नाही पडायचं.
एक दिवस कमली आलीच नाही. अखां दिवस काहीतरी हरवल्यासारखं ‘तिला’ वाटत राहिलं. ती दुसऱ्यादिवशी लवकरच कमलीची वाट पाहत दारात थांबली होती. पण त्या दिवशी पण कमली आलीच नाही. तिला कमालीच्या येण्याची तिच्या भयंकर आवाजाची जणू लथ लागली होती. कमालीच्या न येण्याने ती एवढी अस्वस्थ होईल असं तिला पण कधी वाटलं नव्हतं.रोज घडणाऱ्या गोष्टींची एवढी सवय लागू जाते की आपण त्यात नकळत यवढे वाहवत जातो कळतंच नाही.....
कमली एकदा गेली ती आलीच नाही पुढे तिचं काय झालं पाहूपुढच्या ब्लॉग मध्ये....
- Lolly
English Translation :
Yes i want to rebel...
She was running in the fire of sorrow and danger. Tired of the patriarchal culture, she was overwhelmed by the feeling of revenge. She was very annoyed with love, affection, intimacy. She was trying to get away from herself. She started wandering to overcome the past, wandering around, she came to a small village. There was a small tribal village where she played for a few days but then she came to know the truth. She got acquainted with 'Kamali'.
Kamali's intellect seemed to be zero. She wore a torn sari, her hair was tangled, her forehead was reddish, her teeth were long and her lips were sticking out, her hazel eyes, black and medium height lotus used to go from house to house every day and eat shillings. She and Kamali's friendship was slowly growing, she learned from her landlady that Kamali's husband had left Kamali. Neighbors were saying that Kamali used to look good and look good, but since her husband left her, her head was affected. She and Kamali used to chat a lot. While chatting, Kamali seemed to remember something. She didn't care if anyone gave her a voice or not.
Kamali used to come at 9 in the morning to ask for stale bread and rice. One day the clock will change its time but not dramatically. It was 9 o'clock when Kamali's voice was heard. Although Kamali used to give voice to the housewife in a certain tune, even though she was close to the housewife, she did not feel calm without giving voice.
One day Kamali did not come. She kept feeling like she had lost something all day. She had stopped at the door waiting for Kamali soon the next day. But Kamali did not come that day. It was as if she were addicted to the awful sound of Kamali's coming. She never thought that she would be so upset because of Kamali's absence. We become so accustomed to the things that happen every day that we unknowingly run into it .....
Once Kamali is gone, she never came. See what happened to her in the next blog ....
-Lolly
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा