पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

‘लफडं’ Affair

इमेज
  ‘लफडं’ : Affair सुरळीत चाललेल्या सगळ्यांच्या आयुष्यात वादळ आणलं ते ‘मंगल’ ने. सुंदरबन दिवस दिवस बाहेर राहायचा मग घरची कामं करण्यासाठी गावातला ‘मंगल’ अधून मधून घरी यायचा. मंगल जान जवान बिनलग्नाचा तरुण. उचापुरा दिसायला देखणा. शीतल त्याच्यापेक्षा वयाने मोठी पण नवऱ्याच्या प्रेमापासून लांब राहिलेली मंगलच्या मोहात पडते. वेळ आणि संधी बघून शीतल तिच्या लहान मुलींना घराबाहेर खेळायला पाठवते आणि मंगलला हळूच घरात बोलावते. शीतल जरी मंगलपेक्षा मोठी असली तरी अजूनही तिची ज्वानी जशीच्या तशी उभारत होती. तरुणीला लाजवेल अशी तिची कांती होती. मंगल पण लगेच तिच्या मोहात पडून जातो. सुरळीत चाललेल्या सगळ्यांच्या आयुष्यात वादळ आणलं ते ‘मंगल’ ने. मंगल आणि शीतल चं लफडं खूप दिवस नाही चालू शकलं. ‘मंगलचं हल्ली घरात येणं जाणं ज्यास्त चालू आहे’, असं कोणीतरी सुंदरबनला सांगितलं. सुंदरबन लगेच तातडीने तोडफोड करेल असं नव्हतं. त्याने एक दिवस नेहमीसारखचं बाहेर जाण्याचं नाटक केलं. सुंदरबन बाहेर गेला म्हणल्यावर त्या दिवशी पण मंगल घरी आला, शीतल ने पण मुलींना बाहेर पाठवलं. तोच काही वेळात मंगल आणि शीतल घरात असतानाच सुंदरब...

‘लफडं' Affair

इमेज
  ‘लफडं’ : Affair          लफडं म्हणलं की गावाकडचं प्रेम प्रकरण आठवतं. आजची गोष्ट प्रेम प्रकरणाचीच आहे. पण हे प्रेम प्रकरण कोण्या अविवाहित जोडप्यांच नव्हतं हे होतं ते विवाहितांच्या मधलं, ज्याला लोकांनी लफडं नाव दिलं होतं.       सुंदरबन गावचा प्रतिष्ठित व्यक्ती गावात तंटामुक्तीचं काम तो करायचा. गावची कसली पण अडचण तो मिनिट भरात सोडवायचा. अख्खा गाव त्याला टरकून होता त्याच्या नादी लागणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालणं. पण वाघाच्या जबड्यात हात घालणारा कोणीतरी असतोच ना पावरफुल. असाच एक देखणा बांड गावातला तरुण ज्याने सुंदरबन च्या जबड्यात नाही तर काळजातच हात घातला होता. म्हणजे... सुंदरबन दिसायला देखणा पण भयानक वाटणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावरच्या पिळदार मिशा त्यामुळे त्याचं व्यक्तीमत्व अधिक रुबाबदार वाटायचं. सुंदरबनचं लग्न होवून १० वर्ष झाली होती दोन मुली बरोबर संसार सुखाचा चालू होता. पण आयुष्य सुरळीत चालू राहावं येवढं सोपं नसतं. रस्त्यात काटे कुटे तर असणारच ना. सुंदरबन चा लहान भाऊ त्याचं लग्न होवून ६ वर्ष झाली होती. त्याची बायको ...

जुगार : Gambling : 2

इमेज
  जुगार : Gambling  (पैशाचा की बायका पोरांच्या आयुष्याचा?)    ज्या भावाने पैसे कमवायचा रस्ता दाखवला त्याच भावाने घालवायचा पण दाखवला. .. म्हणजे सट्टेबाजी बरोबर रंडीबाजी पण झालीच पाहिजे. एक दिवस सतीशला त्याचा भाव दारू पाजून एका अशा ठिकाणी घेवून जातो जिथून माघारी येणं म्हणजेच भिकेचे डोहाळे शंभर टक्के लागणा हे निश्चित. सतीश कडे पैसा होता त्यामुळे त्याला दारू आणि बाहेरच्या बाईची लथ लागून गेली. पण पैश्यांचा माज खूप दिवस राहत नाही. काही दिवस वर्ष सतीश सुखा समाधानात खेळला पण दारू आणि बाईने त्याला उतरती कळा लावायची ती लावलीच. हळू हळू त्याच्या जवळची जमापुंजी संपत आली होती. आता त्याला जुगारित यश येणं काही जमायला लागलं नाही. त्यांनी काढलेल्या युक्त्या त्याच्याच पल्ले पडत नव्हत्या. २४ तास नशेत पडून राहायचा म्हणून त्याचा सट्टेबाजी वरचा ताबा सुटून गेला आणि तो पुन्हा जन्माचा भिकारी झाला.   ठेवलेली बाई पण पैसे नसल्यामुळे त्याला हाकलून द्यायला लागली. घरात होतं नव्हतं ते विकून टाकलं होतं. आता फक्त घराच्या भिंती तेवढ्या उभ्या होत्या. पण घर उभा करणारा पाया मात्र खचला ...

जुगार : Gambling

इमेज
जुगार : Gambling (पैशाचा की बायका पोरांच्या आयुष्याचा?)       एका सुशिक्षित बेरोजगाराची ही गोष्ट. शेजारीच राहत असलेलं कुटुंबातील बेरोजगार युवकाची ही गोष्ट. शिक्षण पूर्ण झालं की नोकरी लागायच्या आतंच घरच्यांनी लग्न करून संसाराची जबाबदरी माथी थापल्याने, वाट्टेल ते काम करत सतीश संसाराचा गाडा पेलवत होता.       लग्नाला ३ वर्ष उलटून गेले होते आता घरात एक छोटं बाळ पण आलं होतं. सतीश शिकलेला असून पण दुसऱ्यांच्या शेतात रोजाने कामाला जायचा. नोकरीसाठी खूप प्रयत्न करायचा. पण कुठलीच नोकरी पदरात नाही पडली. शेवटी शेतातच राबावं लागलं पण खूप काळ तो त्याच कामावर टिकून नाही राहिला. त्याने जोडधंदा करायचा ठरवला. एक दिवस तो त्याच्या थोरल्या बंधू बरोबर कल्ब मध्ये जुगार खेळायला जातो. त्याला काही जमत नाही पण जुगारीत येणारा पैसा बघून त्याचं लालच गगनाला भिडतं. घरी आल्याबरोबर बायकोला सगळा प्रकार सांगतो. बायको कमी शिकलेली त्याच्या हो ला हो मिळवत जाते. सतीशने लग्न झाल्यापासून अहोरात्र कष्ट केले, पण कधी बायकोला घराबाहेर काढलं नाही. तिची जबाबदारी अतिशय प्रेमाने आणि काळजी...

तमाशा : Spectacle

इमेज
तमाशा :      (कलेचा बाजाराचा)      पूर्वी तमाशा, जागरणात नाचणारी मुरुळी, थिएटर मध्ये नाचणाऱ्या सुंदर मुली म्हंटल की त्या कोल्हाट्यांच्याच असणार हे शंभर टक्के. पण कालांतराने ही संकल्पना बदलली. हल्ली सगळ्याच जातीची भेळ मिसळ झालेली दिसते. कलावंताच्या नावावर काळं फासून त्या जागी नाच म्हणजे धंदाच बनून गेलाय. उट सूट गरिबी आली की घरच्या पोरींना पाठवा नाचायला आणि कमवा घरी बसून. थिएटर, तमाशा, मुरुळ्या यात नाचणाऱ्या हल्लीच्या पोरी आणि बायांनी कलेचा बाजारच मांडलेला दिसतो. कला बाजूला राहते आणि होतं ते फक्त प्रदर्शन मग ते अंगाचं असो किंवा सौंदर्याचं,  असो...       मी आज तुमच्यासमोर अशीच एक गोष्ट मांडणार आहे. मी अनुभवलेली सत्य घटनेवर आधारित. एका गरीब घरातली मुलगी तिला शिकायची फार आवड. दिसायला प्रचंड सुंदर, काळेभोर डोळे. लांबसडक केस, गोरीगोमटी पण उंचीने थोडी ठेंगणी. वयाच्या १६ व्या वर्षी घरच्यांनी, घरच्यांनी म्हणण्यापेक्षा आईने तिला शाळेतून घरी काढून ठेवलं. तिला काम धंदा शिकवायचा म्हणून तिच्या मावशीकडे पाठवून दिलं.    ...

आदिवासी हक्क : २ Tribal Rights 2

इमेज
आदिवासी हक्क : Tribal Rights ( गायरान जमीनिचा मालकी हक्क सांगणारे लोकं )          गायरान जमीनिचा मालकी हक्क सांगणारे लोकं आज आदिवासी लोकांवर हत्यारं घेवून आली होती. गायरानात ठोकलेले पाल एक एक करून काढून फेकत होती. ‘पुन्हा पाल ठोकले तर पालासकट जाळून टाकील’, म्हणून पाल गोळा करत होती. एक माणूस पाल गोळा करून जाळणार तोच काही आदीवासी बधावांनी अडवलं. पण तो म्हातारा त्यांच्यावर कोयता घेवून धावून जायचा. ‘माझ्या शेतात पाय ठेवला तर या कोयत्याने पाय तोडील म्हणायचा’.        आदिवासींनी धरलेल्या जमिनितलीच १० एकर जमीन त्याची खरेदीची जमीन आहे असे तो सांगत होता. ती सोडून सगळा माळरान तुम्हीच धारा मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही म्हणत होता.’ त्याच्या पाठीशी त्याचा पुतण्या खंबीरपणे उभा होता जो सरकारी कोणत्यातरी पदावर होता.       ही सगळी भांडणं चालू असतानाच एक बऱ्यापैकी सुशिक्षित असणारं जोडपं तिथे जातं आणि घडणारा सगळा प्रकार मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून घेतात. जेंव्हा १० एकर जमिनीचे खरीदीचे पुरावे त्यांना मागितले तेंव्हा ती लोकं आणून दाखव...

आदिवासी हक्क: Tribal Rights : 1

इमेज
  आदिवासी हक्क: Tribal Rights : 1    (आदिवासी लोकांनी गायरानात ठोकलेले पाल उपसून बाजूला करणारा इतर समाजाचा व्यक्ती)      मी आजपर्यंत जे पण ब्लॉग लिहिले ते सगळे अनुभवाचे बोल आहेत. इथून पुढचेही सगळे अनुभवलेलेच किस्से मी तुमच्या समोर मांडेल. काही प्रमाणात वास्तव तर काही प्रमाणात कल्पना अशा दोन्ही बाजू मी एकत्र करून एक गोष्ट तुमच्यासमोर मांडते. आजची गोष्ट आहे ती गावच्या आदिवासींची जी हक्काच्या जमिनिसाठीची लढाई होती.       एक दिवस आदिवा सीं साठी सरकारने नवीन ‘जी आर’ काढला ज्यात सरकारी ५ एकर गायरान जमीन प्रत्येक आदिवा सी कुटुंबानी लागवडीसाठी घ्यावी. ज्यांना उपजीविकेचे साधन नाही त्यांनी ती जमीन कसून खावी. आणि आपली उपजीविका भागवावी. काही कालावधीनंतर ती जमीन ज्यांनी काबीज केली त्याला ती प्रत्येकी ५ एकर प्रमाणे मोजून देईल. असा काहीसा ‘जी आर’ सरकारचा होता.   (गायरानात पाल ठोकायला आलेले आदिवासी बांधव)      कर्जत तालुक्यातील एका गावात जवळ जवळ ३०० एकर च्या वर जमीन गायरान होती. त्यातली काही जमीन जी उपजावू होती ती...

लाखाचे बारा कसे वाजतात? २ How about twelve lakhs? : 2

इमेज
 लाखाचे बारा कसे वाजतात? :   फार वर्षापूर्वी आणि काही भागात आजही पोलीस कसलिही शहानिशा न करता लोकांना   गुन्हेगार ठरवते. माणसाच्या श्रीमंतीवरून त्याची लायकी ठरवली जाते. अंगावरच्या कपड्यावरून त्याची श्रीमंती ठरवली जाते. तशीच काहीशी गोष्ट गोकुळ बरोबर घडली. गोकुळ गरीब शेतकरी, दारुडा त्यामुळे अंगावरची कपडे अगदीच स्वच्छ असल्यामुळे त्याला आज जेल मध्ये पोलिसांनी सडायला भाग पडलं.     चोरीचा ‘च’ ही माहीत नसलेला गोकुळ आज त्याच्या परिस्थितीमुळे आणि दारूमुळे तो जेल मध्ये बसला होता.       एरवी पिवून झुलत हिंडणारा गोकुळ आज तुरुंगात निश्चिंत पडला होता. मात्र त्याच्या घरच्यांचे धाबे दणाणले होते. कधीच कोर्ट कचेरीची पायरी न ओलांडलेले गोकुळाच्या घरचे घाबरून गेले होते. आता काय करायचं गोकुळ ला कसं बाहेर काढायचं. बायका पोरं गावच्या सरपंचाकडे जावून त्यांना सोडवण्यासाठी मदत मागत होते. गावाच्या पुढाऱ्यांनी मदत केली पण पैशांची चांगलीच मागणी केली. आता पैसा फेकल्याशिवाय काहीच होणार नव्हतं हे गोकुळच्या घरच्यांना कळून चुकलं होतं. गोकुळने आणि त्यांच्या घरच्यांनी...