‘लफडं' Affair
‘लफडं’ : Affair
लफडं म्हणलं की गावाकडचं प्रेम प्रकरण आठवतं. आजची गोष्ट प्रेम प्रकरणाचीच आहे. पण हे प्रेम प्रकरण कोण्या अविवाहित जोडप्यांच नव्हतं हे होतं ते विवाहितांच्या मधलं, ज्याला लोकांनी लफडं नाव दिलं होतं.
सुंदरबन गावचा प्रतिष्ठित व्यक्ती गावात तंटामुक्तीचं काम तो करायचा. गावची कसली पण अडचण तो मिनिट भरात सोडवायचा. अख्खा गाव त्याला टरकून होता त्याच्या नादी लागणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालणं.
पण वाघाच्या जबड्यात हात घालणारा कोणीतरी असतोच ना पावरफुल. असाच एक देखणा बांड गावातला तरुण ज्याने सुंदरबन च्या जबड्यात नाही तर काळजातच हात घातला होता. म्हणजे...
सुंदरबन दिसायला देखणा पण भयानक वाटणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावरच्या पिळदार मिशा त्यामुळे त्याचं व्यक्तीमत्व अधिक रुबाबदार वाटायचं. सुंदरबनचं लग्न होवून १० वर्ष झाली होती दोन मुली बरोबर संसार सुखाचा चालू होता. पण आयुष्य सुरळीत चालू राहावं येवढं सोपं नसतं. रस्त्यात काटे कुटे तर असणारच ना.
सुंदरबन चा लहान भाऊ त्याचं लग्न होवून ६ वर्ष झाली होती. त्याची बायको अफाट सुंदर होती. तशी सुंदरबनची बायको पण काय कमी सुंदर नव्हती पण लालच येतं ते नेहमी दुसऱ्यांची बायको बघूनच. सुंदरबन भावाची बायको म्हणून कितीही तिचा मोह वाटला तरी तो स्वतःवर ताबा ठेवायचा पण जर समोरून सिग्नल मिळाला तर सुंदरबनच काय पण कोणताही पुरुष स्वतःवरचा ताबा हरवून बसेल अगदी तसच झालं. सुंदरबन दिसायला देखणा होता आणि गावात त्याचा दबदबा होता. सुंदरबनच रुबाबदार रूप बघून त्याच्या भावाची बायको आनंदी त्याच्या मोहात पडली. आणि होत्याचं नव्हतं झालं ते इथेच....
दोन परिवार उधवस्त व्हायला वेळ लागलाच नाही. बघता बघता सगळ्या गावात आणि पंचक्रोशीत त्याचं प्रेम प्रकरण, प्रेम प्रकरण म्हणण्यापेक्षा गावठी भाषेतलं ‘लफडं’ म्हणायचं ते पसरलं. सुंदरबनची बायको शितल मनातून तुटत चालली होती. ती आपल्या दोन मुलींन बरोबर दिवस घालवत होती. सुंदरबनच तिच्यावरून पूर्ण दुर्लक्ष झालं होतं.
आनंदी पण तिच्या नवऱ्यापासून चोरून चोरून सुंदरबनबरोबर फिरायची जायची तिला तिच्या लहान लहान मुलांची देखील परवा नव्हती. सुंदरबनचा भावू दशरत त्याला जे काय चाललंय त्या बद्दल माहिती होती पण तोंड कोणापुढे उघडणार. बायकोला बोलावं तर ती सुंदरबनला सांगेल आणि दशरत सुंदरबनला एका शब्दाने पण बोलू शकत नव्हता. कारण सुंदरबनला बोलणं म्हणजे आपल्या जीवाला धोका करून घेणं. सुंदरबनची बायको पण त्याला काहीच बोलू शकत नव्हती.
शेवटी जे चाललंय ते सुरळीत चाललंय हे समजून सगळे गप्प बसले होते. पण गोष्ट सरळ चालली तर त्यात अर्थ नाही राहत. मग सगळ्याचं आयुष्य बदलून जाईल असं काहीतरी तुफान येणं बाकी होतं. त्याची वेळ आता आली होती.
सुरळीत चाललेल्या सगळ्यांच्या आयुष्यात वादळ आणलं ते ‘मंगल’ ने...
मंगल कोण होता, त्याने सुंदरबन आणि शीतल यांच्या आयुष्यात काय वादळ आणले ते बघू पुढच्या ब्लॉग मध्ये...
-Lolly
Affair :
Lafad said that he remembers the love affair near the village. Today's story is about love. But this love affair was not between an unmarried couple, it was between a married couple, which people called a scandal.
He used to work for the settlement of disputes in the village. He would solve any problem of the village in a matter of minutes. The whole village was tormented by him.
But there is someone who puts his hand in the tiger's jaw and is not powerful. Such a handsome young man from Bond village who had put his hand not in the jaws of Sunderbans but in sorrow. I mean ...
The Sunderbans, his handsome but horrible looking mustache, made his personality more radiant. It had been 10 years since Sunderban got married and life was going well with two daughters. But life is not easy. There must be thorns in the road.
Sunderban's younger brother had been married for 6 years. His wife was very beautiful. The wife of the Sundarbans was no less beautiful, but she was always tempted to look at other people's wives. No matter how much she was tempted to be Sunderban's brother's wife, she wanted to control herself, but if she got the signal from the front, it would be Sunderban but any man would lose control of himself. The Sunderbans were handsome in appearance and dominated the village. His brother's wife Anandi was tempted to see the beautiful appearance of Sundarbans. And it didn't happen, it just happened here ....
It didn't take long for the two families to fall apart. His love affair spread all over the village and in Panchkrushi. Sunderban's wife was cold-hearted. She was spending the day with her two daughters. Sundarbans had completely ignored her.
She was happy, but she did not care about her little ones. Dashrat, the brother-in-law of Sunderbans, knew what was going on, but he would not open his mouth to anyone. If you talk to your wife, she will tell Sunderban and Dasharat could not say a word to Sunderban. Because talking to the Sunderbans is like risking your life. Sunderban's wife could not say anything to him.
In the end, everyone was silent, realizing that what was going on was going well. But if the story goes straight, it doesn't make sense. Then there would be a storm that would change everyone's life. His time had come.
'Mangal' brought a storm in the life of everyone who was running smoothly ...
In the next blog, we will see who Mangal was, what storm he brought in the life of Sunderbans and Sheetal ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा