लाखाचे बारा कसे वाजतात? २ How about twelve lakhs? : 2
लाखाचे बारा कसे वाजतात? :
फार वर्षापूर्वी आणि काही भागात आजही पोलीस कसलिही शहानिशा न करता लोकांना गुन्हेगार ठरवते. माणसाच्या श्रीमंतीवरून त्याची लायकी ठरवली जाते. अंगावरच्या कपड्यावरून त्याची श्रीमंती ठरवली जाते. तशीच काहीशी गोष्ट गोकुळ बरोबर घडली. गोकुळ गरीब शेतकरी, दारुडा त्यामुळे अंगावरची कपडे अगदीच स्वच्छ असल्यामुळे त्याला आज जेल मध्ये पोलिसांनी सडायला भाग पडलं.
चोरीचा ‘च’ ही माहीत नसलेला गोकुळ आज त्याच्या परिस्थितीमुळे आणि दारूमुळे तो जेल मध्ये बसला होता.
एरवी पिवून झुलत हिंडणारा गोकुळ आज तुरुंगात निश्चिंत पडला होता.
मात्र त्याच्या घरच्यांचे धाबे दणाणले होते. कधीच कोर्ट कचेरीची पायरी न ओलांडलेले
गोकुळाच्या घरचे घाबरून गेले होते. आता काय करायचं गोकुळ ला कसं बाहेर काढायचं.
बायका पोरं गावच्या सरपंचाकडे जावून त्यांना सोडवण्यासाठी मदत मागत होते. गावाच्या
पुढाऱ्यांनी मदत केली पण पैशांची चांगलीच मागणी केली. आता पैसा फेकल्याशिवाय काहीच
होणार नव्हतं हे गोकुळच्या घरच्यांना कळून चुकलं होतं. गोकुळने आणि त्यांच्या
घरच्यांनी तिनका तिनका करून साचवलेली जमापुंजी एक एक करून सगळी घालवली. गोकुळ
जेलमध्ये बायको भेटायला आल्यावर जोर जोरात रडायला लागला तिला म्हणायला लागला, ‘लक्ष्मी मला इथून बाहेर काढ मी आजपासून कधीच
दारू पिणार नाही’. लक्ष्मी तिथून रडत बाहेर येते. जेवढे पैसे होते तेवढे
त्यांनी वकील आणि गावच्या पुढारी लोकांना वाटले. काही चार पैसे व्याजाने दिलेले
तेही व्याज न घेताच मुद्दल गोळा करून वकिलाला देत होते.
आज गोकुळला तरुंगातून बाहेर काढता काढता ६ महिने उलटून गेले अमाप पैसा ओतला तरीही तो बाहेर नाही येवू शकला. नुसत्या तारखांवर तारखा दिल्या जायच्या. लक्ष्मीने गोकुळ ला बाहेर काढण्यासाठी शेत पण विकून टाकलं होतं. पण अजून काहीच झालं नव्हतं. न केलेल्या गुन्ह्यात गोकुळ चांगलाच अडकून पडला होता. गोकुळाच्या घरच्यांवर आता उपाशी राहण्याची वेळ आली होती. दोघे भावू कामाला जायचे दुसऱ्यांच्या शेतात तर दोन मुली घर सांभाळायच्या. तारखेला गेल्यावर दोन लहान मुली उपाशी राहायच्या शेजारच्या घरी जावून निम्म्या रात्री पर्यंत बसून राहायच्या. कारण जिल्ह्याच्या ठिकाणाहून यायला घरच्यांना उशीर व्हायचा. शेतात एकटच घर असल्यामुळे मुली एकट्या घाबरायच्या.
८ महिने उलटून गेले गोकुळला जेल मध्ये बसून होता. आता तर वकिलाची फी द्यायला देखील पैसे नव्हते. लक्ष्मी कडे घर विकण्याशिवाय दुसरा पर्यायचं उरला नव्हता. शेवटी राहतं घर पण लक्ष्मी विकते आणि दुसरीकडे पाल ठोकून राहायला जाते. लक्ष्मीचा संसार १० रुपयाच्या फुग्यामुळे रस्त्यावर येवून पडला होता.
अथांग प्रयत्नानंतर आणि सगळा संसार धुळीला मिळाल्यानंतर गोकुळ तब्बल १३ महिन्याने जेलमधून घरी सुटून येतो. उघड्यावर पडलेला संसार बघून डोकं बडवून घेतो. सगळ्यांना जवळ घेवून जोरजोरात रडायला लागतो.
काही महिन्यानंतर पालाचं गोकुळ पुन्हा घर बनवतो. पण मनात दारूचं लालच कायमच. खूप दिवस मनावर ताबा ठेवला होता पण आता त्याला काय राहवतच नव्हतं. गोकुळ पुन्हा एक फुगा मारून घरी येतो घरचे पुन्हा डोक्याला हात लावून हा काही सुधारणारच नाही म्हणून, जे ते ज्याच्या त्याच्या कामाला निघून जातात.
शेवटी एक म्हण आहे “जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही” हे खरच...!
-Lolly
💜 If you want little champ dance video please go ahead our you tube channel:
https://youtu.be/Yjv5by5IyK4
https://youtu.be/HRaOh465T6o
https://youtu.be/AuRYlSh1el0
https://youtu.be/7qtsqN3Zz4k
English Translation:
How about twelve lakhs? :
Many years ago and in some areas even today, the police find people guilty without any investigation. Man's worth is determined by his wealth. His wealth is determined by the clothes he wears. Something similar happened with Gokul. Gokul is a poor farmer, a drunkard, so his clothes were so clean that he had to rot in jail today.
Gokul, who did not know the identity of the thief, was in jail today due to his condition and alcohol.
Gokul, who was drinking erv and hanging out, was in jail today. But his family was scarred. Gokul, who had never crossed the steps of the court office, was terrified of his house. What to do now How to get Gokul out.
The women were going to the village sarpanch and asking for help to rescue him. The village leaders helped but demanded a good deal of money. Gokul's family had misunderstood that nothing would happen without throwing money away. Gokul and his family spent all their savings one by one. When Gokul came to visit his wife in jail, he started crying loudly and said, "Lakshmi, get me out of here, I will never drink alcohol from today."
Lakshmi comes out crying. As much money as he had, he thought of lawyers and village leaders. Some of the money was paid to the lawyer without any interest.
Today, 6 months have passed since Gokul was released from prison, but he could not get out even after pouring huge amount of money. Just give dates on dates. Lakshmi had sold the farm to get Gokul out. But nothing happened yet. Gokul was well involved in the unsolved crime. It was time for Gokul's family to go hungry. The two brothers used to go to work in each other's fields while the two girls used to take care of the house.
When the date was over, the two little girls would go to the house next door to stay hungry and stay up till midnight. Because it used to be late for the family to come from the district place. The girls were scared to be alone as there was only one house in the field.
After 8 months, Gokul was in jail. Now there was no money to pay the lawyer's fee. Lakshmi had no choice but to sell the house. At last Lakshmi lives but sells the house and goes to live on the other side. Lakshmi's world had collapsed on the road due to a 10 rupee bubble.
Gokul is released from jail after 13 months after a lot of hard work and getting the whole world dusted. He looks at the open world and shakes his head. He takes everyone close and starts crying loudly.
After a few months, Palak Gokul builds a house again. But the lust for alcohol is always in my mind. He had been in control of his mind for a long time, but now he had no choice. Gokul comes home with a bubble again. Putting his hand on the head of the house again will not improve anything, which is why he leaves for his work.
In the end, there is a saying, "Victory does not go away without death" is really ...!
-Lolly
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा