आदिवासी हक्क: Tribal Rights : 1

 

आदिवासी हक्क: Tribal Rights : 1 


 (आदिवासी लोकांनी गायरानात ठोकलेले पाल उपसून बाजूला करणारा इतर समाजाचा व्यक्ती)

    मी आजपर्यंत जे पण ब्लॉग लिहिले ते सगळे अनुभवाचे बोल आहेत. इथून पुढचेही सगळे अनुभवलेलेच किस्से मी तुमच्या समोर मांडेल. काही प्रमाणात वास्तव तर काही प्रमाणात कल्पना अशा दोन्ही बाजू मी एकत्र करून एक गोष्ट तुमच्यासमोर मांडते. आजची गोष्ट आहे ती गावच्या आदिवासींची जी हक्काच्या जमिनिसाठीची लढाई होती.

      एक दिवस आदिवासींसाठी सरकारने नवीन ‘जी आर’ काढला ज्यात सरकारी ५ एकर गायरान जमीन प्रत्येक आदिवासी कुटुंबानी लागवडीसाठी घ्यावी. ज्यांना उपजीविकेचे साधन नाही त्यांनी ती जमीन कसून खावी. आणि आपली उपजीविका भागवावी. काही कालावधीनंतर ती जमीन ज्यांनी काबीज केली त्याला ती प्रत्येकी ५ एकर प्रमाणे मोजून देईल. असा काहीसा ‘जी आर’ सरकारचा होता. 

 (गायरानात पाल ठोकायला आलेले आदिवासी बांधव)

    कर्जत तालुक्यातील एका गावात जवळ जवळ ३०० एकर च्या वर जमीन गायरान होती. त्यातली काही जमीन जी उपजावू होती ती काही आदिवासी कुटुंबांनी आपल्या ताब्यात घ्यायचे ठरवले. पण गावातले काही लोकंनी ही जमीन त्यांच्या मालकीची आहे असा दावा लावून बळकावली होती. 


(आदिवासी बांधवांना गायरानावर मालकी हक्क दाखवणारे इतर समाजाची लोकं )

    तशी ती जमीन कोणाच्या मालकीची नव्हती सरकारी गायरान पण लोकांनी खरेदीची जमीन म्हणून काबीज करून ठेवली होती. शेवटी आदिवाशी ते आपल्या जबान चे पक्केच त्यांना माहित होतं की ही जमीन गायरान आहे कोणाच्या खारीदीची नाही. ती जमीन मिळवल्याशिवाय ते ही स्वस्त बसणारे नव्हते. त्या गावच्या काही ८, १० आदिवासी कुटुंबांनी आपापल्या पद्धतीने जमिनीच्या जागा ठरवून आपापले पाल ठोकले होते. ज्याचा पाल जिथे त्याचे ती गायरान जमीन. 

(गायरानात ठोकलेल्या पालची पाहणी करताना इतर समाजाचा माणूस) 

    खूप दिवस आदिवासींनी सरकार ची वाट पहिली की कोणीतरी येईल सरकार कडून, कलेक्टर ऑफिस कडून आणि प्रत्येकाला जमिनी वाटून दिल्या जातील. पण असं काही झालंच नाही. एकीकडून गावाची काही लोकं त्यांना जमिनीत जोम बसू देत नव्हते तर दुसरीकडे सरकार काही हालचाल करत नव्हते. दोघांच्या कचाटीत सापडलेला आदिवासी आज हताश झाला होता. पण धीर सोडायला तयार नव्हता.

 

(आदिवासी लोकांना दम दाटी करताना इतर समाजाची लोकं)

    काही ठराविक म्होरक्या लोकांनी पुढाकार घेवून गाव गावच्या आदिवास्यांकडून  सगळ्या सरकारी ऑफिस मध्ये अर्ज पाठवले, “आम्ही अमुक अमुक ठिकाणाची जमीन कसून खाण्यासाठी घेतली आहे तरी त्याची रीतसर मोजणी करून देण्यात यावी...”

     पण समोरून फक्त कागदीच उत्तर मिळालं की, ‘धरलेली गायरान जमीन तुम्ही कसून खावू शकता’. पण गावाचे काही ठराविक लोकं त्यांच्या जीवे बेतेल एवढी भयाण कृत्य करायला लागली हे मात्र सरकारला समजेना.

    काही दिवस त्या आदिवसी कुटुंबांनी पुन्हा वाट पहिली आणि शेवटी एक मोर्चा काढला त्याही मोर्चात त्यांना सरकारकडून मोठ मोठी आश्वासनं देण्यात आली. सरकारने फक्त ‘जी आर’ काढला पण त्याची अंमलबजावणी करायला मात्र विसरून गेलं. ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीने ‘जी आर’ ची अंमलबजावणी करायची म्हणून त्याला बेवारस सोडून दिलं.

    प्राचीन काळापासून मुळचे रहिवाशी असलेले आदिवासीं आपला हक्क तर मिळवणारच होते पण तो कसा हे आपण पुढच्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.....

                                                    -Lolly

 

 English Translation: 

Tribal Rights:

               Whatever blogs I create to date are words of experience. From now on, I will share my thoughts with you. In fact, some ideas combine to make your case. Today's story is about the land structure of the village tribals.

One day the government issued a new GR for the tribals in which the government should take 5 acres of gyran land for cultivation with each tribal family. Those who do not have the means of subsistence should eat the land thoroughly. And make a living. After some time, the land will be given to those who have acquired it as 5 acres each. Something like that belonged to the GR government.
 
               In a village in Karjat taluka, about 300 acres of land was cultivated. Some tribal families decided to take possession of some of the fertile land. But some villagers had seized the land, claiming it belonged to them. The land was not owned by the government but by the people. In the end, the tribals knew for sure that this land is for sale and not for anyone to buy it.
It would not have been cheap without acquiring the land. Some 8, 10 tribal families of that village had set up their own tents by deciding the land in their own way. The land where the sail is.
 
               For many days, the tribals waited for the government to come and get someone from the government, from the collector's office and allotment of lands to everyone. But that did not happen. On the one hand, some people of the village were not allowing them to settle in the land, on the other hand, the government was not doing anything. Adivasi, who was found in a quarrel between the two, was disappointed today. But he was not ready to give up.
 
               Some prominent leaders took the initiative and sent applications from village to village tribals to all the government offices, saying,
But the only answer in front of me was a paper saying, 'You can eat all the land you have acquired'. However, the government did not realize that certain people of the village were committing such horrific acts against their lives.
 
               For a few days, the tribal families waited again and finally staged a protest, in which they were given big promises by the government. The government only issued the GR but forgot to implement it. He left her unattended as he wanted to implement GR in his own way.
 
                    In the next blog, we will see how the natives, who have been natives since ancient times, were supposed to get their rights.
 
                                                                                                                          -Lolly 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जन्मठेप : १ Birth control: 1

आदिवासी हक्क : २ Tribal Rights 2