तमाशा : Spectacle


तमाशा :  

 (कलेचा बाजाराचा)


    पूर्वी तमाशा, जागरणात नाचणारी मुरुळी, थिएटर मध्ये नाचणाऱ्या सुंदर मुली म्हंटल की त्या कोल्हाट्यांच्याच असणार हे शंभर टक्के. पण कालांतराने ही संकल्पना बदलली. हल्ली सगळ्याच जातीची भेळ मिसळ झालेली दिसते. कलावंताच्या नावावर काळं फासून त्या जागी नाच म्हणजे धंदाच बनून गेलाय. उट सूट गरिबी आली की घरच्या पोरींना पाठवा नाचायला आणि कमवा घरी बसून. थिएटर, तमाशा, मुरुळ्या यात नाचणाऱ्या हल्लीच्या पोरी आणि बायांनी कलेचा बाजारच मांडलेला दिसतो. कला बाजूला राहते आणि होतं ते फक्त प्रदर्शन मग ते अंगाचं असो किंवा सौंदर्याचं,

 असो...


      मी आज तुमच्यासमोर अशीच एक गोष्ट मांडणार आहे. मी अनुभवलेली सत्य घटनेवर आधारित. एका गरीब घरातली मुलगी तिला शिकायची फार आवड. दिसायला प्रचंड सुंदर, काळेभोर डोळे. लांबसडक केस, गोरीगोमटी पण उंचीने थोडी ठेंगणी. वयाच्या १६ व्या वर्षी घरच्यांनी, घरच्यांनी म्हणण्यापेक्षा आईने तिला शाळेतून घरी काढून ठेवलं. तिला काम धंदा शिकवायचा म्हणून तिच्या मावशीकडे पाठवून दिलं.

      आता गोरीगोमटी मावशी काय काम करत होती विचारलं तर, बिचारी थिएटर मध्ये नाचायला जायची. आता मोहिनीने मावशीसारखा नाच शिकावा आणि नाचायला जावून पैसे कमवून आणावे ही बिचाऱ्या गरीब मावूलीची इच्छा. मोहिनीला नाचायला यायचं पण ती शाळेत २६ जानेवारीला किंवा शाळेच्या गॅदारिंग मध्ये नाचायची. मोहिनीला नाचायला आवडायचं पण स्वतःसाठी दुसऱ्यांसाठी नाही.


     मोहिनीला तिची मावशी नाच शिकवते, शिकून झाल्यावर मोहिनी घरी पळून येते. पण तिची आई तिला परत मावशीकडे घेवून जाते. आता मोहिनीची नाच करणारी कलाकार म्हणून नाही तर कमवणारी म्हणून ओळख होणार होती.

      मोहिनी नाचायला जायला नको म्हणायची, सारखी घरी पळून यायची, एकदा तिच्या आईने  कोण्या अनोख्या थिएटर मध्ये जावून तिला सोडलं तिथं तिला भलताच प्रकार दिसला ती थेट मावशीकडे पळून आली ती आता आईकडेपण जायला नको म्हणायला लागली. आईने तिला पळून आली म्हणून बेदम मारली. मोहिनीला नाचकाम च्या ठिकाणी भलताच बाजार होताना दिसायचा, कोण व्यक्ती कधी कसा वागेल आणि काय करेल हे कोणीच सांगू शकत नव्हतं. तिची मनस्थिती दिवसंदिवस बिघडत चालली होती. मोहिनीला तिच्या नाच आणि सौंदर्याचा मान मिळायचा पण तिला त्या गोष्टीची घीन यायची. काही वर्ष मोहिनिकडून काम करून घेतल्यानंतर तिच्या आईने तिचं लग्न करून द्यायचं ठरवलं. ती आता सगळं सोडून छान संसार थाटून जगायचा विचार करत होती. पण एखाद्या व्यक्तीचं दैवच भयानक...

      मोहिनाला एका चांगल्या घराचं स्थळ येतं, मुलगा देखणा बांड असतो. मोहिनीच्या सौंदर्याला टक्कर देणाराच. दोघांच्या घरच्यांना जागा पसंत पडते आणि लग्नाची वेळ तारीख ठरते. 


लग्न झाल्यानंतर मोहिनी नांदायला जाते. तिचं स्वप्न साकार होतं. ती खूप खुश होती. सोन्यासारखं सासर मिळाल्यामुळे तिच्या आनंदाला उधान आलं होतं. पण दैव काही लोकांची आयुष्याच्या अंतापर्यंत परीक्षा घेत राहातं हे खरंच. मोहिनीच्या आनंदाचं उधान खूप दिवस राहीलं नाही. ज्या गोष्टीपासून लांब राहण्यासाठी लग्न केलं तीच गोष्ट नव्याने तिच्या समोर येते. कमवणारी सून कोणाला नको असते, मग तिने कसं पण कमवू दे दोन पैसे घरात आणले की घरातले पण आणि बाहेरचे पण सगळेच खुश.

      नाईलाजास्तव मोहिनीला लग्नानंतरही नाचायला जावं लागतं. पूर्वी नाचायला नाही गेलं की आई मारायची आता नवरा आणि सासू दोघांची भर पडली एवढंच काय ते घडलं तिच्या आयुष्यात. 

 

                                                                -Lolly 

English Translation : 

Spectacle:

               In the past, The Beautiful girls dancing in the Theater, the Muruli dancing in the wake, said that it must be one hundred percent that of the foxes. But over time, that is likely to change. Nowadays, all castes seem to be mixed. In the name of the artist, dance has become a business in that place. If there is poverty, send the kids home to dance and earn while sitting at home. It seems that the art market has been set up by the young ladies and girls who are dancing in theaters, spectacles and puppets. Art stays aside and is just an exhibition, be it of the body or of Beauty,
 
 Anyway ...
 
               I am going to tell you one such thing today. Based on a true incident I experienced. A girl from a poor family loves to learn. Huge to look at, dark eyes. Long hair, curly but a little thicker in height. At the age of 16, her mother kicked her out of school at home rather than at home. She was sent to her aunt to teach her work.
 
               Now when Gorigomti asked her aunt what she was doing, she would go to the theater to dance. Now it is the wish of poor Mavuli that Mohini should learn to dance like her aunt and earn money by going to dance. Mohini used to come to dance but she used to dance at school on 26th January or in school gatherings. Mohini loves to dance but not for herself.
 
               Mohini is taught dance by her aunt. After learning, Mohini runs away from home. But her mother takes her back to her aunt. Now Mohini would be known not as a dancing artist but as an earner.
 
               Mohini didn't want to go to dance, like she used to run away from home. The mother beat her to death as she ran away. Mohini used to see a good market at the place of dance, no one could tell who would ever behave and what they would do. Her mood was getting worse by the day. Mohini used to respect her dance and beauty but she hated that. After working for Mohini for a few years, her mother decided to marry her. She was thinking of giving up everything and living a good life. But the fate of a person is terrible ...
 
               Mohina gets a place in a good house, the boy has a handsome bond. The one who beats the beauty of charm. The couple loves the place and the wedding time is the date.
 
               After getting married, Mohini goes to Nanda. Her dream was coming true. She was very happy. She was overjoyed to have a father-in-law like gold. But it is true that God keeps testing some people till the end of their lives. Mohini's happiness did not last long. The only thing that comes to her mind again is the thing she got married to stay away from. No one wants a daughter-in-law who earns money, so how can she earn money?
 
               Mohini has to go to dance even after marriage because of Nila. In the past, she did not go to dance, but now she has to kill her mother. 
 
                                                                 -Lolly 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी हक्क: Tribal Rights : 1

जन्मठेप : १ Birth control: 1

आदिवासी हक्क : २ Tribal Rights 2