आदिवासी हक्क : २ Tribal Rights 2

आदिवासी हक्क : Tribal Rights


(गायरान जमीनिचा मालकी हक्क सांगणारे लोकं)      

   गायरान जमीनिचा मालकी हक्क सांगणारे लोकं आज आदिवासी लोकांवर हत्यारं घेवून आली होती. गायरानात ठोकलेले पाल एक एक करून काढून फेकत होती. ‘पुन्हा पाल ठोकले तर पालासकट जाळून टाकील’, म्हणून पाल गोळा करत होती. एक माणूस पाल गोळा करून जाळणार तोच काही आदीवासी बधावांनी अडवलं. पण तो म्हातारा त्यांच्यावर कोयता घेवून धावून जायचा. ‘माझ्या शेतात पाय ठेवला तर या कोयत्याने पाय तोडील म्हणायचा’.

     आदिवासींनी धरलेल्या जमिनितलीच १० एकर जमीन त्याची खरेदीची जमीन आहे असे तो सांगत होता. ती सोडून सगळा माळरान तुम्हीच धारा मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही म्हणत होता.’ त्याच्या पाठीशी त्याचा पुतण्या खंबीरपणे उभा होता जो सरकारी कोणत्यातरी पदावर होता.

      ही सगळी भांडणं चालू असतानाच एक बऱ्यापैकी सुशिक्षित असणारं जोडपं तिथे जातं आणि घडणारा सगळा प्रकार मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून घेतात. जेंव्हा १० एकर जमिनीचे खरीदीचे पुरावे त्यांना मागितले तेंव्हा ती लोकं आणून दाखवू म्हणायला लागले. ज्यावेळी त्या सुशिक्षित जोडप्यांनी भांडणाऱ्या लोकांना उलट प्रश्न विचारायला सुरवात केली आणि पुरावे मागायला सुरवात केली तेंव्हा त्या लोकांनी माघार घेतली. मुळात जमीन सरकारी असल्यामुळे कोणाकडे काय पुरावे त्याचे. 

      काही इतर जातीच्या लोकांनी फॉरेस्ट ऑफिसर ला ही आदिवासी बांधावाविरोधात उभा केलं पण त्याचं ही काही चालू शकलं नाही कारण जमीन फॉरेस्टची नव्हती महसूल खात्याची होती म्हणून फॉरेस्ट ऑफिसर पण काही बोलू शकली नाही. लोकांनी आदिवासी बांधवांना नाना प्रकारे घाबरवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा एकही प्रयत्न कामी आला नाही. शेवटी त्यांना त्यांच्या मालकीची जमीन नाही हे कबूल करायला या आदिवासी बांधवांनी लावलं, तशी ती लोकं श्रीमंत घरातले भरपूर जमिनी पण त्यांना गुरं, शेळ्या, मेंढ्या चरायला जमीन हवी होती म्हणून आदिवासींचा त्या जमिनीवर जोम बसू द्यायचा नाही ठरवलं होतं.  

 

(खूप कष्टाने जमिनी ताब्यात घेतल्यावर कसलेली जमीन)

    शेवटी खूप कष्टाने जमिनी ताब्यात घेतल्या, प्रत्येक कुतुबांनी गुण्यागोविंदाने त्या आपापसात मोजून घेतल्या आणि कसून खायला सुरवात केली. आज कोणाच्या शेतात तू तर कोणाच्या शेतात उडीद तर ज्वारी असी भरगोस पिकं काढायला सुरवात केली. आणि आपली दैनंदिन उपजीविका भागवायला सुरवात केली.

    शेवटी आदिवासींची लढाई त्यांनीच पूर्ण पणे पार पडली पण सरकारी एकही कर्मचारी तिकडे फिरकला नाही. सरकारने जी आर काढला आणि नुसता वर्तमान पत्रात छापून बेवारस सोडून दिला. आता ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करायची. मग त्यात कोणाचा जीव गेला तरी चालेल पण सरकार काय त्याकडे लक्ष देणार नाही. कारण सरकारने आदिवासींची उपजीविका भागवली ना जमिनी धरायला सांगून आणि त्या कसून खायला सांगून. तोच तर सगळ्यात मोठा उपकार आहे आदिवासी बांधवांवर सरकारचा, असो.....

(आदिवासी आणि हक्काची कसलेल्या जमिनीतले पिक)

    पण आज ज्याच्याकडे जमीन आहे तो आदिवासी समाधानी आहे त्याच्या हक्काचं काहीतरी आहे. पिक आणि शेतात पिकवून आपली उपजीविका तर तो भागवत आहे.

 

                                                            -Lolly 

 English Translation: 

Tribal Rights :

    The people claiming the ownership of the land of Guyran had come today with weapons against the tribal people. One by one, the sails were thrown away. ‘If you hit the sail again, it will burn with the sails’, so the sails were being collected. A man was about to collect a sail and burn it when he was stopped by some tribal elders. But the old man used to run after them with a sickle. "If you set foot in my field, this scythe will break your foot." He was saying that 10 acres of land held by the tribals is his purchased land. Except for her, all the Malrans were saying, 'I will not tell you anything.'
 
               While all these quarrels are going on, a well-educated couple goes there and records everything that happens in their mobile. When they were asked for proof of purchase of 10 acres of land, they started asking them to bring it. When the educated couple started questioning the quarrelsome people and asking for evidence, they backed away. Since the land is basically government land, who has the proof?
 
               Some people of other castes raised the Forest Officer against this tribal bond but it did not work out because the land did not belong to the Forest Department but to the Revenue Department but the Forest Officer could not say anything. The people tried to intimidate the tribals in various ways but to no avail. In the end, the tribals forced them to admit that they did not own the land, as they had a lot of land in rich houses but they wanted land for grazing cattle, goats and sheep, so they decided not to allow the tribals to settle on that land.
 
               In the end, with great difficulty, they took possession of the lands, and each of the Qutb counted them among the Gunya Govindas, and began to eat them thoroughly. Today, in someone's field, you have started to grow a lot of crops like urad and sorghum. And began to make ends meet.
 
               In the end, the battle of Adivasi was completely over, but not a single government official turned up. The government removed the GR and simply printed it in the present paper and left it unanswered. Now whoever wants to implement it in his own way. Then it will work even if someone dies in it but the government will not pay attention to it. Because the government did not provide livelihood to the tribals by asking them to hold lands and eat them thoroughly. That is the biggest favor of the government to the tribal brothers, anyway .....
 
               But today, those who have land are satisfied with their rights. He earns his living by growing crops and fields.
 
                                                        -Lolly

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी हक्क: Tribal Rights : 1

जन्मठेप : १ Birth control: 1