जन्मठेप : १ Birth control: 1
जन्मठेप : १
आजपर्यंत जे पण ब्लॉगवर लिहिलं ते सगळं वास्तवाशी सांगड घालून लिहल आहे. म्हणजेच अवतीभवती घडलेल्या गोष्टी ज्या मी अनुभवल्या त्या तुमच्यासमोर मांडल्या आहेत. आजही अशीच मी अनुभवलेली गोष्ट तुमच्यासमोर मांडणार आहे.
जन्मठेप...
रोज डोळ्यासमोर ये जा करणाऱ्या १६ वर्षाच्या चिमुरडीची ही गोष्ट. वयाने लहान होतीच पण सुकन्या गतिमंद देखील होती. त्यामुळे तिने कधी शाळेचा श ही कधी अभ्यासला नाही. रोज छान नटून थटून राहायचं छान छान खायचं आणि रानात शेळ्यामागे जायचं हेच काम ती रोज करत असायची. अधून मधून ती घरचा स्वयंपाक सुद्धा अगदी सुगरणी सारखा करायची. माझा आणि तिचा परिचय एक ते दीड वर्षाचा. कधी बोलणं चालणं नाही व्हायचं पण दारातून येता जाता मात्र हसून दाखवायची. तर कधी घराच्या अवती भवती शेळ्या चारताना नाचून दाखवायची. कधी जवळ नाही आली नेहमी आपलं लांबून लांबून मनोरंजन करायची. आम्हाला तिची आता सवय लागली होती एखाद दिवशी ती हसली नाही किंवा नाचली नाही की कळून जायचं की तिचं आणि तिच्या आईचं काहीतरी आज वाजलं. पण असं खूप कमी वेळा व्हायचं. सुकन्या नेहमी हसतमुख राहायची. पण अलीकडे तिचं हसू ओशाळलं होतं.
सुकन्या सावळीच पण दिसायला सुंदर होती. सावळ्या चेहऱ्यावर रोज खुलणारं हसू तर अजूनच उठून दिसायचं. सुकन्या थोडी भोळी भाबडीच होती. कोणी गोड बोललं की साध्या भोळ्या मानाने त्यावर विश्वास टाकून वाहून जायचं. अगदी त्याच गोष्टीचा फायदा एका मनोरुग्णाने उचलला आणि होत्याचं नव्हतं करून ठेवलं. त्यानंतर सुकन्याच्या चेहऱ्यावरचं हसू कायमचं हरवून गेलं.
रोजच्या सारखीच आजही सुकन्या नटून थटून शेळ्या घेवून शेतात चारायला आली होती, आजही छान हसून आणि नाचून दिवस गोड करून पुढे शेळ्या चारायला निघून गेली. पण आज जे तिच्या समोर वाडून ठेवलं होतं ते ना तिला माहित होतं ना आम्ही कधी कल्पना केली होती......
सुकन्येच पुढे काय झालं? कोणी तिचं हसू हेरावून घेतलं? या सगळ्यांची उत्तरं पाहू पुढच्या ब्लॉग मध्ये....
पण गुन्हेगारांना शिक्षा तर होणारच होती. हे आजच्या कोर्टाच्या निकालावरून कळलं. आजही भारतीय न्यायव्यवस्था सत्याच्याच बाजूने आहे पैशाच्या नाही हे या घटनेवरून कळतं...
-Lolly
English Translation:
Birth control
Everything that has been written on the blog till today has been written in a realistic way. That is, I have presented to you the things that have happened to me. I will tell you the same story today.
Birth control...
This is the story of 16 year old Chimurdi who comes in front of my eyes every day. She was young but also had a slow pace. So she never went to school. She used to do the same thing every day, eat well and go after the goats in the forest. From time to time, she used to do her home cooking like Sudharani. My acquaintance with her is one to one and a half years old. I never wanted to talk but I used to smile when I came through the door. I used to dance around the house while grazing goats. Never came close, always wanted to entertain us from afar. We were used to it now that one day she would not laugh or dance, we would know that something happened to her and her mother today. But that rarely happened. Sukanya was always smiling. But recently her smile had faded.
Dry shade but beautiful to look at. The smile that appeared on Shadow's face every day was still rising. Sukanya was a little naive. If someone spoke sweetly, he would simply believe it and carry it away. One psychiatrist took advantage of the situation and did what he had to do. After that, the smile on Sukanya's face disappeared forever.
Today, as usual, she had come to the field with dry goats to graze. But she didn't know what was laid out in front of her today and we never imagined ......
What happened next? Did anyone miss her smile? Let's see the answers to all these in the next blog ....
But the criminals were to be punished. This is known from today's court verdict. Even today, the Indian judiciary is on the side of truth, not money...
-Lolly
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा