लाखाचे बारा कसे वाजतात? : How about twelve lakhs? :

 

लाखाचे बारा कसे वाजतात? : 

 


गोष्ट तशी जुनीच पण मी आज तुमच्या पुढे नव्याने मांडते आहे. लाखाचे बारा कसे वाजतात हे फक्त गावाकडच्या दारुड्या लोकांना आणि त्याच्या घरच्यांनाच माहित असतं. अशीच विनाकारण अंगलोट आलेली एक गोष्ट तुमच्या समोर मांडते. 

      हौसेला मोल नाही म्हणतात ते खरच, दारू पिणाऱ्या लोकांच पण तेच तर असतं दारू पिवून झाकी मारत फिरायचं हीच हौस असते. पण काही लोकांच्या ही हौस अंगलोट येते. जस की गोकुळ १० रुपयांचा फुगा प्यायचा पण बाता मात्र जगभराच्या करायचा. (फुगा – गावाकडे मिळणाऱ्या हातभट्टी चा एक ग्लास)


    गोकुळ दारू प्यायल्यानंतर अख्खा गाव डोक्यावर घ्यायचा, त्याच्या घरचे त्याला खूप कंटाळले होते, दारू पिवून कुठेपण रस्त्याच्या कडेला त्याची टांगापलटी व्हायची, मग त्याची दोन मुलं एकाचं लग्न झालेलं एकाचं नाही ती त्याला घरी घेवून यायची. खूप वेळा असं व्हायचं की गोकुळ पिवून आला की घरच्यांना घराबाहेर काढायचा त्याचा दबदबा किती आहे हे दाखवण्यासाठी तो सगळ्यांना घराबाहेर झोपवायचा. घराबाहेर म्हणजेच शेतात, घर शेतात होतं म्हणून शेतात झोपायचे. कधी रात्रभर पाऊस अंगावर घ्यायचा तर थंडीच्या दिवसात थंडीने कुडकुडत रात्र उघड्यावर काढायची. सकाळी नशा उतरली की सगळे आपापल्या कामाला लागायचे. खूप वेळा सगळ्यांना वाटायचं की चांगलाच चोप द्यावा पण बिचारे आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून सगळं मुकाट पणे सहन करायचे. गोकुळला तीन मुली होत्या त्यातल्या थोरलीचं लग्न झालं होतं. दोन बाकी होत्या पण त्यांना घर सोडून पळून जावू वाटायचं नाहीतर लहान वयातच लग्न करून घेवू वाटायचं. घरचा प्रत्येक सदस्यांना गोकुळचा वैतागला होता. दोन फुग्यातच तो अख्या जगाचा बाप होवून जायचा.

    एकदा बाजारच्या दिवशीच बाजार न करता सकाळी सकाळीच एक फुगा टाकला आणि टल्ली होवून गोकुळ कट्ट्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची उगाच छेड काढत बसला, थोडा वेळ गेल्यानंतर अजून एक फुगा घेतला आणि मग काय सांगायलाच नको. त्याच दरम्यान शेजारच्या गावात कुठे तरी चोरी झाली होती म्हणून पोलिसांची रेलचेल चालू होती बाजारात. “त्या वेळचे पोलीस पण खूपच कामसू आणि चपळ म्हणायचे म्हणजे, ‘चोर सोडून संन्याश्याला फाशी’ असे!”. चोरी करणारा चोर नाही सापडला की, एखाद्या गरिबाला दानाला लावायचं असं त्याचं काम, असो... त्याचं कौतुक सांगायलाच नको.  


त्या दिवशी पण कदाचित चोरी करणारा चोर सापडला नाही म्हणून कोणी बकरा सापडतोय का त्याच्या शोधात होते कदाचित बराच वेळानंतर फिरून ते त्या कट्ट्या जवळ आले जिथे गोकुळ पिवून बडबड करत बसला होता. देशभराच्या राजकारणावर भाषण देत होता. चोराला शोधून वैतागलेल्या पोलिसांनी त्याला हुसकावून लावलं तो पण बिचारा चुकलं साहेब...माफ करा साहेब... म्हणत बडबडत निघून चाललेला होता, पण पोलिसांची ‘चणाक्ष बुद्धी’ बिचाऱ्या बेवड्या गोकुळला ताब्यात घेतला आणि त्यालाच चोर बनवून कोर्टात हजार केला..... 

गरिबीच्या झुल्यात झुलून वैतागलेल्या गोकुळाच्या घरच्यांची त्याला जेल मधून बाहेर काढण्यासाठी झालेली फरफट यैकून तर अंगावर शहरे येतील...

गोकुळची पुढची गोष्ट पाहू आपण पुढच्या blog मध्ये.

                                                    -Lolly

 

English Translation: 

  How about twelve lakhs? :

    The story is so old but today I am presenting it to you anew. Only the drunkards of the village and his family know how the twelve lakhs of lakhs are played. This is one of the reasons why Anglo has come to you for no reason.
 
               Hausa is said to be of no value, it is really the people who drink alcohol, but it is the same thing. But for some as a baby gets older, he or she will outgrow this. Like Gokul used to drink a bubble of 10 rupees but he used to talk all over the world. (Fuga - a glass of hand kiln near the village) Gokul used to take the whole village on his head after drinking alcohol. It often happened that when Gokul got drunk, he would make everyone sleep outside the house to show how powerful he was to get his family out of the house. Outside the house means in the field, the house was in the field so I used to sleep in the field. Sometimes it rained all night, but on a cold day, it would get cold outside. After getting drunk in the morning, everyone would go to work. A lot of times everyone thought that they should give a good beating but the poor people used to bear everything silently as their own teeth and their own lips. Gokul had three daughters, the eldest of whom was married. There were two left, but they did not want to run away from home, they wanted to get married at a young age. Every member of the household was annoyed by Gokul. In two balloons, he would become the father of the whole world.
 
               Once on the market day, he threw a balloon in the morning without going to the market. Meanwhile, a burglary had taken place in a neighboring village and a police patrol was going on in the market.
 
    "The police of that time, however, were very cunning and agile, meaning 'leave the thief and hang the ascetic'!" If the thief is not found, his job is to give alms to a poor person.
 
    On that day, the thief was probably not found, so he was looking for a goat. He was giving a speech on politics across the country. He was chased away by the police who were annoyed to find the thief, but the poor man made a mistake.
 
               If Gokul's family members, who are suffering from poverty, try to get him out of jail, then cities will come to him ...
 
               We will see the next story of Gokul in the next blog. 

                                                                                                                 -Lolly

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आज धंदा बंद! : part 2

आज धंदा बंद! :

जन्मठेप : १ Birth control: 1