जन्मठेप : ३ Birth control : 3

जन्मठेप : ३  Birth control :3 


बराच वेळ झालं शेळ्या बेवारस सारख्या चरत राहिल्या आणि आपल्याबरोबर असणारी व्यक्ती कुठे दिसेना म्हंटल्यावर शेळ्यांनी थेट घराचा रस्ता पकडला आणि भरधाव घेत सगळ्या शेळ्या घरी पोहचल्या. शेळ्या घरी आल्या पण सुकन्या कुठे दिसेना म्हणून घरचे तिला शोधायला निघाले. जंगलाच्या दिशेने जाताना सुकन्या तिच्या घरच्यांच्या नजरेस पडली. अतिशय घाबरलेली आणि उधवस्त अवस्थेत ती त्याच घरासमोर बसून होती जिथे ती पाणी प्यायला गेली होती.

५५ वर्षाच्या नराधमाने भोळ्या भाबड्या सुकन्येचे जागो जागी लचके तोडले होते. तिच्यावर अत्याचार करून रक्तभम्बाळ केलं होतं. सुकन्या थर थर कापत होती ती त्याच अवस्थेत गुडगे पोटाशी घालून हमसून हमसून रडत होती. घरच्यांनी तिची ती अवस्था बघून लगेच तिला जवळ करून शांत केलं. सुकन्याही घरचे आल्यावर थोडी शांत झाली आणि घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. घरच्यांनी त्या नराधमाचा शोध घेतला पण तो लगेच राहत्या घरून पळून गेला होता. घरच्यांनी सुकन्येला धीर दिला आणि लगेच तिला जवळच्या पोलीस स्टेशनला घेवून जावून गुन्हा दाखल केला.

पोलिस अधिकार्यांनी ही घटनेला गम्भिर्यानी घेवून गुन्हा दाखल झाला की त्याच क्षणी सगळी यंत्रणा कामाला लावली आणि पुढच्या तासाभरात तर तो नराधमाला पोलीस कोठडीत घेतला.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्या नराधमाने अधिकाऱ्यांना पैशाचे आमिष दाखवले एवढेच नाही तर अत्याच्यारी सुकन्येच्या घरच्यांना देखील त्याने पोलीस केस माघारी घेण्यासाठी पैशाचे लालच दाखवले. पण ते लालच काही त्याला पचनी पडलं नाही. त्याने जेलमधून बाहेर येण्यासाठी नाना प्रयत्न केले. पैसे फेकण्यापासून ते सुकन्येच्या घरच्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यापर्यंत सगळे प्रयत्न केले पण ते सगळे वायाला गेले.

काही तासात त्याला कोर्टासमोर हजर केले. सुकन्येने देखील न घाबरता आणि न डगमगता आपली बाजू खंबीरपणे कोर्टासमोर मांडली. गुन्हा सिद्ध झाला आणि त्या नराधमाला शिक्षा झाली.

शेवटी त्या नराधमाने केलेल्या कुकृत्याची शिक्षा तर त्याला होणारच होती. सगळे ठोस पुरावे मिळाल्यानंतर कोर्टाने निकाल जाहीर केला आणि कलम ३७६() IJN,   कलम 506,(3),(4) ,  कलम 3AWL 2 , 3,2G    3,2 BA असा गुन्हा दाखल केला आणि आरोपीस ‘जन्मठेपेची शिक्षा’ सुनावली.


आणि आपली न्यायव्यवस्था आजही गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता सत्याच्या बाजूनेच न्याय देते हे सिद्ध झाले. आणि सुकन्येला न्याय मिळाला.

                                                 -Lolly 

English Translation :

Birth control :

 

    The goats grazed for a long time and when the person who was with them was missing, the goats took the road directly to the house and all the goats reached home. The goats came home but the family went to look for her as Sukanya was nowhere to be seen. On her way to the forest, Sukanya caught the eye of her family. Frightened and devastated, she was sitting in front of the house where she had gone to get water.
 
               The 55-year-old man had broken the ligaments in the place of naive sister-in-law Sukanya. She was tortured and bloodied. She was cutting dry layers. The family, seeing her condition, immediately calmed her down. Sukanya also calmed down a bit when she came home and told the family what had happened. The family members searched for the culprit but he immediately fled the house. The family reassured Sukanya and immediately took her to a nearby police station to file a case.
 
    Police officers took the incident seriously and filed a case. At that moment, the entire system was put into operation and within the next hour, the culprit was taken into police custody.
 
               After being arrested by the police, the man not only lured the officers with money, but also lured the family members of the abusive Sukanya with money to withdraw the police case. But he could not digest that greed. He made various attempts to get out of jail. They tried everything from throwing money to threatening to kill Sukanya's family but they all went to waste.
 
               He was produced before the court in a few hours. Sukanya also defended herself firmly before the court without fear or hesitation. The crime was proved and the culprit was punished.
 
               In the end, he was going to be punished for the crime he had committed. After receiving all the concrete evidence, the court pronounced the verdict and charged the accused under Section 376 (2) IJN, Section 506, (3), (4), Section 3AWL 2, 3,2G 3,2 BA and sentenced the accused to life imprisonment.
 
               And it has been proven that our justice system still does justice to the rich without discriminating between the rich and the poor. And Sukanya got justice.

 

                                        -Lolly

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आज धंदा बंद! : part 2

आज धंदा बंद! :

जन्मठेप : १ Birth control: 1