जन्मठेप : २ Birth control: 2
जन्मठेप : २ Birth control
रोजच्या सारखीच आजही सुकन्या नटून थटून शेळ्या घेवून शेतात चारायला आली होती, आजही छान हसून आणि नाचून दिवस गोड करून पुढे शेळ्या चारायला निघून गेली. पण आज जे तिच्या समोर वाडून ठेवलं होतं ते ना तिला माहित होतं ना आम्ही कधी कल्पना केली होती......
शेतात चरता चरता
शेळ्यानी आज अचानक जंगलाकडे धाव घेतली. सैराट झालेल्या शेळ्यांना आवरता आवरता थकून
गेलेली सुकन्या एका झाडाखाली बसली होती. शेळ्यांच्या पाठीमागे पळून पळून तहान
लागल्यामुळे ती पाण्याने भरलेली बॉटल शोधू लागली पण पळता पळता बॉटल कुठेतरी पडली
तिला समजलंच नाही. तहानेने घसा सुकून गेला होता तिला आता पाण्याशिवाय राहवेना
म्हणून तिने पुन्हा शेळ्या घराच्या दिशेने हकलून काढल्या. जंगलातून घरी येताना
तिला एक छोटंसं घर दिसलं, तहानेने व्याकूळ झालेल्या सुकन्येला वाटलं थोडंसं पाणी
मागून पहावं, घरी पोहोचेपर्यंत तहान तरी भागेल, या आशेने ती त्या छोट्याश्या
घरासमोर गेली दरवाजा उघडाच होता पण बाहेर कोणी दिसत नव्हतं म्हणून ती घरात
डोकावण्यासाठी पुढे सरसावली तोच एक ५०,५५ वर्षाचा माणूस तिच्या समोर येवून थांबला.
साधी भोळी सुकन्या अचानक समोर आलेल्या माणसाला बघून घाबरली आणि मागे सरकली तेंव्हा पुढे होवून तोच पुरुष बोलला, ‘घाबरू नको बाळा मीच आहे, काय हवय तुला’? तेंव्हा सुकन्या घाबरलेल्या जीवात थोडा जीव आणून म्हणाली, ‘मला तहान लागली थोडं पाणी मिळेल का’? त्या पुरुषाने क्षणाचाही वेळ न घालवता दरवाजातून बाजूला झाला आणि म्हणाला, ‘ पाणी हवाय का? मग घे की हाताने हे आपलंच घर आहे त्यात विचारायचं काय आहे, घे पाणी आणि पी’. त्या पुरुषाने येवढा आपलेपणा दाखवला की साधी भोळी सुकन्याने लगेच घरात जावून पाणी प्यायला घेतलं. बराच वेळपासून तहानलेली सुकन्येनं एक तांब्या भरून पाणी गट गट घशाखाली उतरवलं. आणि लागलीच घराबाहेर पडायला लागली अगदी त्याच वेळी नियतीने आपली बाजू पलटवली आणि ५५ वर्षीय पुरुषाच्या मनातला राक्षस जागा झाला तिथेच सुकन्येच्या आयुष्याला ग्रहण लागुण गेलं... आणि सुकन्येचं हसू कायमचं बंद होवून गेलं...
न घडावी अशी घटना घडून गेली. १६ वर्षाच्या सुकन्येबरोबर सगळं घरदार तुटून पडलं अन अवघा गाव हळहळून उठला. अमाप पैसा ओतला तरी भारतीय न्याय व्यवस्थेने आज सत्याच्या बाजूने न्याय देवून सत्याचं पारडं जड केलं.
सुकन्येला न्याय कसा मिळाला? याची उर्वरित गोष्ट पाहू पुढच्या ब्लॉग मध्ये...
-Lolly
English Translation:
Birth control
Today, as usual, she had come to the field with her goats to graze. But she didn't know what was laid out in front of her today and we never imagined ......
The goats grazing in the field today suddenly ran towards the forest. The emaciated goats were sitting under a tree, exhausted. She ran after the goats and became thirsty.Her throat was dry from thirst, so she chased the goats towards the house again so that she would not be left without water. On her way home from the forest, she saw a small house. Sukanya, anxious and thirsty, wanted to ask for some water, but when she reached home, she was thirsty. A 55-year-old man stopped in front of her. The simple naive Sukanya was frightened when she saw the man in front of her and when she stepped back, the same man stepped forward and said, 'Don't be afraid baby, it is me, what do you want'? Then Sukanya breathed a sigh of relief and said, ‘I am thirsty, can I get some water’? Without wasting a moment, the man stepped aside through the door and said, ‘Do you want water? Then take it by the hand, this is your house, what is there to ask in it, take water and p '. The man showed such closeness that the simple naive Sukanya immediately went home and started drinking water. Sukanya, who had been thirsty for a long time, filled a copper cup and poured water down her throat. And immediately she started to fall out of the house. At the same time, destiny changed its side and a monster was awakened in the mind of a 55 year old man.An unforeseen event happened. With 16-year-old Sukanya, the whole house collapsed and the whole village was shaken. Despite pouring in huge sums of money, the Indian justice system today has made the truth difficult by giving justice in favor of the truth. How did Sukanya get justice? Let's see the rest of this in the next blog ... -Lolly
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा