आदिवासी हक्क : २ Tribal Rights 2
आदिवासी हक्क : Tribal Rights ( गायरान जमीनिचा मालकी हक्क सांगणारे लोकं ) गायरान जमीनिचा मालकी हक्क सांगणारे लोकं आज आदिवासी लोकांवर हत्यारं घेवून आली होती. गायरानात ठोकलेले पाल एक एक करून काढून फेकत होती. ‘पुन्हा पाल ठोकले तर पालासकट जाळून टाकील’, म्हणून पाल गोळा करत होती. एक माणूस पाल गोळा करून जाळणार तोच काही आदीवासी बधावांनी अडवलं. पण तो म्हातारा त्यांच्यावर कोयता घेवून धावून जायचा. ‘माझ्या शेतात पाय ठेवला तर या कोयत्याने पाय तोडील म्हणायचा’. आदिवासींनी धरलेल्या जमिनितलीच १० एकर जमीन त्याची खरेदीची जमीन आहे असे तो सांगत होता. ती सोडून सगळा माळरान तुम्हीच धारा मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही म्हणत होता.’ त्याच्या पाठीशी त्याचा पुतण्या खंबीरपणे उभा होता जो सरकारी कोणत्यातरी पदावर होता. ही सगळी भांडणं चालू असतानाच एक बऱ्यापैकी सुशिक्षित असणारं जोडपं तिथे जातं आणि घडणारा सगळा प्रकार मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून घेतात. जेंव्हा १० एकर जमिनीचे खरीदीचे पुरावे त्यांना मागितले तेंव्हा ती लोकं आणून दाखव...